कल्पनेच्या सुंदर जगात
तुमलाच रोज बघते आहे
तूम्ही सोबत नसून ही
तुमच्याच सोबत जगते आहे
एक दिवस नक्की कमी होईल
नको असलेले हे अंतर
आज मात्र समजावते मनाला
भेटू कधी तरी नंतर
वेळ काढून भेट ठरली
आनंद झाला मनी
चेहऱ्यावर हसू दिसत होते
पण डोळ्या मध्ये होते पाणी
भेटल्या वर एक गोष्ट कळली
प्रेमाला तुमच्या तोड नाही
जवळ जाऊन ही मात्र
सांत्वणाची करायची जोड नाही....