"फिनिक्स."
या इथे मी चांदण्याला,
जरासा थांब म्हणालो
अंधारात चंद्राला लागले,
ग्रहण पुन्हा म्हणालो......
रात्रीस उजळण्याची आता,
प्रतिक्षा पुरे झाली
म्हणून समईच्या वातीस,
मी विझून जा म्हणालो....
असह्य झाले जगणे तर,
धुराचे शाप कशाला
आत्ताच सरणाला एकदाचे,
मी पेटून घ्या म्हणालो....
धुमसत्या समाजाची आता,
शांत झालीत घरे
मी विझणार्या राखेतून,
पुन्हा जन्म घे म्हणालो...
त्या दिलाचे राहिलेले,
प्रदिप उसने व्यवहार आता
बाकी चुकते करण्यात,
पुन्हा जन्म घेईन म्हणालो.....
कवी-प्रा.प्रदिप इजारदार