"अस्तित्व."
राखून ठेवला जो,
फक्त माझाच गुलाब होता
त्यावर मनिषा ज्याने,
तो त्याचाच हक्क होता....
एकाचे अस्तित्व संपले,
दुजा ह्रधयातून गेला होता
कामापरता वापरून तीने,
त्यास फेकून दिला होता...
एक सोडून गेली,
धोक्याची किनार होती
माझ्या मोगर्यातल्या चादरीचा,
गंध हुकमी घातकी होता....
लक्तरे टांगलेल्याचे,
वस्रहरण चव्हाटी झाले,
तेंव्हाच नेमके जोगडा,
माझा मुखवटा होता....
स्मरणात नसता कांही,
धागा हळुवार विनला होता
तो प्रेमाखातर मनिषाने,
प्रदिप ला गुलाब देला होता...
प्रा.प्रदिप इजारदार