Bluepadटेक इट इझी....जगण्याचा सहज छंद.
Bluepad

टेक इट इझी....जगण्याचा सहज छंद.

डॉ अमित.
डॉ अमित.
20th Jun, 2020

Share

टेक इट इझी....जगण्याचा सहज छंद.

उर्वशी उर्वशी...टेक इट इझी उर्वशी.
जीत का मंत्र हैं टेक इट इझी पॉलिसी...

प्रभू देवाचं हे गाणं खूप वर्षांपूर्वी खूप गाजलं होत. नव्हे खूप धुमाकूळ घातला होता या गाण्यानं.
हटके गाण्याचे बोल आणि झिंग आणणारं नी ठेका धरायला लावणार ए आर रहमान यांचं संगीत आणि त्यात पडद्यावर भर रस्त्यावर बेमालूम पदतालीत्य करत बेफाम नाचणारा प्रभू देवा.
जगण्याचं सहज आणि सोप सूत्रं या गाण्याच्या एका ओळीतून गुणगुणलं होतं.
खरंच आहे,आपल्या रोजच्या जगण्यात सगळ्याचं गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात.बऱ्याच वेळा आपण ठरवतो एक आणि होत दुसरचं.या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपल्या मनावर येणारा ताण,होणारी मनाची चीड चीड,त्रासदायक मनस्ताप.
कारण बऱ्याच वेळा काही गोष्टी बदलणे,परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसतेच.
उदाहरणतः आपण प्रवासात निघालो नी वाटेत गाडी पंक्चर झाली किंवा खूप ट्राफिक मुळे बऱ्याच वेळ आपण एका जागीच अडकून पडलो.अश्या आणि इतर बऱ्याच गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात घडत असतात ज्यावर आपल नियंत्रण नसते.काही दुखदं असतात तर काही क्लेश उत्पन्न करणाऱ्या असतात.अश्या वेळी विनाकारण वैतागून जाण्यापेक्षा जस्ट टेक इट इझी हा मंत्र जर आपण मनात पुटपुटला आणि ती वेळ आनंदाने स्वीकारली तर मग तीच परिस्थिती आपल्याला वेगळी वाटेल.आपली चीड चीड होणार नाही.
जगण्यातला हा यू टर्न खूप महत्वाचा आहे.
कारण इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी कधी कधी यू टर्न घेणे खूप गरजेचे असते.जेंव्हा परिस्थिती बदलता येत नाही तेंव्हा आपण आपल्या स्वतःत घेतलेला हा यू टर्न आपलं अंतर्मन पिंजून काढतो.कापूस जसं पिंजला की गुंता सुटून तो आणखी हलका होतो तसे आपलं मनही हलकं फुलकं होत.मध्यंतरी असाच एक सुंदर विचार वाचण्यात आला होता की जर देव तुमच्यावर आलेली परिस्थिती बदलत नसेल तर तो नक्कीच तुमचं हृदय बदलत असणार.म्हणजे की तो तुमची विचार करण्याची वृत्ती,दृष्टीकोन बदलत असणार.
आपल्या मराठीत एक सुंदर अस वाक्य आहे,नव्हे सत्यचं सांगितले आहे की,
जे होतं ते चांगल्यासाठीच.
खूप खोल असा अर्थ दडला आहे या एका वाक्यात.
मला तर याचा वेळोवेळी अनुभव आला आहे किंवा असं म्हणता येईल की हे वाक्य मी अक्षरशः जगलो आहे,जगतो आहे.
खूप प्रेरक नी पूरक असं वाक्य आहे हे.
जे जे आपल्या आयुष्यातं घडतं ते चांगलं असो की वाईट ते अंततः चांगल्यातच परिवर्तित होणार आहे असा जर आपण कायम विश्वासं ठेवला तर आपले जीवन किती सुखकर नी हवं हवसं होवून जाईल.होईल मनासारखं नेहमीच
नाही ही जीवनाची रीत
जीवन एक खेळ आहे ज्यात
कधी हार होईल कधी जीत


पण या हार जीत ला सहज स्वीकारणे हे तेंव्हाच शक्य होईल जेंव्हा तुम्ही तुमच्यात टेक इट इझी चा छंद जोपासताल.हो मी याला छंदच म्हणेन कारण एखादा चांगला छंद तुम्हाला आतून बाहेरून बदलण्यास नव्हे बहरण्यास मदत करतो.हे तुमचं अंतर्बाह्य बहरणे तुमचं जगणं हे गुणगुणणं करतात.
तुम्हीच ठरवा मग हे जीवन गुणगुणत जगायचं की भुणभुणत?वेळ येवुद्या कसलीही
म्हणा फक्त टेक इट इझी
परस्थिती बदलेल क्षणातं
रहा सत्कर्मात सतत बिझी.
डॉ अमित लाड.12 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad