जिंकून सुद्धा एक लढाई तेव्हा आपण हारतो
जेव्हा तो त्याचे रंग बदलतो
त्याच्यासाठी अट्टहास करतो
आई वडिलांच मन दुखावतो
ना समाज, ना जात-पात,ना धर्माचा विचार करतो
प्रेम नावाच्या भुताला पार डोक्यावर चढवतो
एक लढाई जिंकूनही तेव्हा आपण हारतो
जेव्हा तो त्याचे रंग बदलतो,
हवा हवासा वाटणारा सहवास
जेव्हा जन्मठेपे सारखा वाटतो
रुंजी घालणारा स्पर्श तेव्हा विनयभंग वाटतो
जित्यापणी जगायला तिच्यावाटी नरक येतो
जिंकलेली लढाई तेव्हा आपण हारतो
जेव्हा तो त्याचे रंग बदलतो.
अपर्णा.