बाजार मांडला ईथे,
आयुष्याला खेळ समजुन,
किरायाने घेतला ईथे,
माणसाला जनावर समजुन.
बाजार मांडला ईथे,
आयुष्याला लपंडाव समजुन,
शोधणाऱ्याचा आनंद,
दुप्पट ईथे,
लपलेल्यांना,
कमजोर समजुन.
आयुष्याचा खेळ मांडला ईथे,
आयुष्याला गुलाम समजुन,
वाईट सवयीने घेतला ईथे,
हर तरुणाचा बळी,
तरुणाईला गुलाम समजुन.
आयुष्याला बेलगाम केले ईथे,
आयुष्याला.........,
घोडयाची रेस समजुन.
भाव लावल्या जात आहे ईथे,
सतत पळणाऱ्या,
तरुणाईला बेकार समजुन.
बाजार मांडला ईथे........,
आयुष्याला खेळ समजुन..
आयुष्याला खेळ समजुन.
--------------------------
कवी-सुधीर बी. पिंपळे.
मो. 9850822848.
================