असाच विचार मनात आला
शब्दांना नवा अर्थ मिळाला
"अ"आ "आई"चा झाला
इकडे "इ" चे झाले रूपांतर
"ई" ला मिळाला हक्क समांतर
प्रत्येक शब्दाचा मान वाढविला
गर्व तरीही ना तीने केला
आई,ताई,अक्षर जोडुन
शब्दांचा नवा अर्थ बनविला
कळण्यास थोडा उशीर झाला
"उ" नी "ऊ" चा अर्थ मिळाला
ॐ कार चा स्वर गुंजला...
"ऋ" हा ऋषी चा झाला
शब्दास त्याचा मान मिळाला
अर्थ कळुनी शब्दाचा तो
"ऋ" चा हळुच "ऋणी" झाला
"ए" घरातून धावत आला
"अ" सोबत भांडत बसला
पहीला मान पाहीजे मला
शब्दांना तो सांगत सुटला
गणिताला दया आली
जागा त्याला करूनी दिली
एक,एकवीस,एक्तीस मध्ये
"ए" न मोठी बाजी मारली
ऐतिहासिक जागा मिळवली
स्वतःची ओळख बनऊनी
अनंत अंकात मिसळून गेली
अशी स्वरांची ओळख झाली
व्यंजनांची साथ मिळाली
शब्दांना नवा अर्थ लागला
अज्ञानी हा ज्ञानी झाला
वाक्य रचना बनवीत गेला
एक नवी ही भाषा आली
अशी आमची बोली झाली....
माय मराठी उदयास आली.
अशी आमची बोली झाली...
माय मराठी उदयास आली.
- संविधा विवेक वाळले