आयुष्याचे बिघडले गणित,
वाटेत आता नेहमी अपयश येतं (१)
नेहमीसारखा हसणारा मी आता नाही हसत,
रस्त्यात आता नेहमी मला काटे बोचतात(२)
वाटेत भेटणारा मला आता सगळे सल्ले देतात,
माझे अपयश बघून माझ्यावर हसतात(३)
म्हणतात अरे हुशार तू होता,
नाही लागत वेळ दिवस बदलता(४)
अपयश आले म्हणून रडत बसायचे नसतात,
प्रयत्नांची साथ घेऊन उंच उडायचे असतात(५)
हार मानून असे खचून जायचे नसतात,
जीवन असे अनुभव वेळोवेळी देत असतात(६)