जास्त चहा प्याली गोड पदार्थ खाल्ले तर शुगर होते जास्त राग राग जर कुणावर केला तर स्वतःलाच त्रास होतो. जास्त उष्णतेचे पदार्थ खाल्ले तर शरीरामध्ये खूप प्रमाणात हीट होते उष्णता होते.माणसाला सुख आणि दुःख तेवढ्याच गोष्टी दोन्ही पण मर्यादित पाहिजे तरच जगन्यात मजा आहे. जास्त गर्व केला मी मोठा मी मोठा म्हणलं तर स्वतः त्याचा त्यालाच गर्वहरण होतो. माज केला तर एक दिवस लाज पत्करावी लागते.म्हणून आहे त्यात समाधान राहण्याचा प्रयत्न करा. हा देह आपल्या हातात नाही आहे काय खातोय काय पितोय याचा पण मेन्टेनन्स ठेवावं लागतो आपल्या आरोग्याची काळजी तेव्हडीच महत्वाची आहे. आणि कुणाचा पदरी गरिबी आली वाईट झालं म्हणून हसू नका त्याला जमेल तितकी मदत करा त्याचा सुख दुखत सामील व्हा कारण दिवस प्रत्येकाचे येत असतात. सो कस वागायचं हे तुमचं तुम्ही ठरवा.सुख दुःख खाचखळगा संकट येतच राहतात त्यावेळी तुम्ही कस सामोरं जाता यावर तुमचं आयुष्य अवलंबुन असत. जे तुम्ही दुसर्यांना देता तेच तुम्ही परत मिळवत असता.... विचार करून वागा कि तुम्हाला नक्की काय करायच आहे. काळ कठीण आहे पण काळाला सांगा कि मी माझा संघर्ष चालू आहे. मग कितीही असो काळ कठीण कारण पावनखिंड बघून असं वाटत कि माझा बाजीप्रभूने जशी खिंड लढवली तशी लढवू कारण हि वेळ काळ आहे तसा कधीच राहत नाही कारण रामाने श्रीरामाने लिहून ठेवलय हि वेळ हि निघून जाईल..... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏