Bluepad | Bluepad
Bluepad
जसा व्यक्ति तसे प्रश्न आपल्या प्रश्नांच स्वरूप आपलं व्यक्तिमत्त्व ठरवत
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
28th Feb, 2023

Share

*जसा व्यक्ति तसे प्रश्न आपल्या प्रश्नांच स्वरूप आपलं व्यक्तिमत्त्व ठरवत*.
जीवनातील प्रश्न चांगले पण असतात अहितकारक पण असतात सार्थक असार्थक असतात.प्रश्न हे सत्याचा वेध घेणारे असावेत लोक हितार्थ आत्म उद्धार करणारे ज्ञाना मार्गावर घेऊन जाणारे आपलं अस्तित्व घडविणारे असावेत.एंकदरीत आपल्या प्रश्नांची उंची दर्जा हा उच्च पराकोटीचा असावा.आपल्या मनात निर्माण होणारा प्रश्न ठरवतो आपण कसं व्यक्तिमत्व आहेत .आरसा जसा चेहरा दाखवतो तसंच आपला प्रश्न आपलं व्यक्तिमत्त्व दाखवतो. प्रश्न निर्माण होण गैर नाही . त्यांचं सार्थकी मुल्य कस आहे त्या नुसार आपला दर्जा ठरतो .मनातील द्वंद्व हे न थांबणार युद्ध आहे या युद्धामुळे अनेक प्रश्न दैनंदिन निर्माण होतात .याला आपण किती खतपाणी घालतोय किती जोपासतो त्या नुसार त्याचा प्रभाव आपल्या वर आपल्या जीवनावर चालतो.अवास्तव प्रश्न जीवनात अशांतता निर्माण करतात म्हणून आपल्या प्रश्नांचा दर्जा हा दर्जेदारच असला पाहिजे. प्रश्न दर्जेदार तरच आपण उत्कृष्ट व्यक्तिमत्व समाधानी असतो .पण निर्थक प्रश्न आपल्या जीवनात अशंततेच वादळं निर्माण करतात. आपल्या जीवनात दैनंदिन आपल्याला किती प्रश्न निर्माण होतात त्या पैकी जीवन जाण्यासाठी किती आवश्यक असतात त्या पैकी उपयोगी किती निरोपयोगी किती याच मुल्य मापन केले तर सार्थक प्रश्न ऐवजी निर्थक प्रश्न जीवनात जास्त असतात त्या मुळे आपल्या जीवनात अशांतता निर्माण होतो . आणि प्रश्न हा आपला निकटतम साथी आहे. असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही नाही ज्यांच्या मनात प्रश्न नाही मात्र स्वरूप भिन्न भिन्न असत हे स्वरूपच व्यक्तिच मुळ रूप प्रकट करत . अपवादाने प्रश्न नाहीच असा व्यक्ती सापडला तर तो व्यक्ती सर्वसाधारण नक्कीच नाही.इथ पर्यंत तर सर्वसामान्य गणित आहे. जे समजण्यात फार काही अडचण येण्याचं कारण नाही. मानवी जीवन हे तसं प्रश्नांच्या भोवती फिरत पण प्रश्न म्हणजे काय तर भ्रमक कल्पना अथवा दैनंदिन जीवन अथवा आपलं भविष्य या भोवती फिरणारे संकल्प अथवा विकल्प ज्याला आपण भ्रमक कल्पना समजु शकतो. ह्याच कल्पना प्रश्न व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या असतात‌ म्हणजे जसा व्यक्ति तशा कल्पना रूप धारण करत असतात . प्रश्ना वरून सुरू झालेलं जीवन निप्रश्न स्थिती मध्ये पोहचण्याचा कार्यकाल म्हणजे जीवनाचा उत्कर्ष. हाच उत्कर्ष जीवनाचं मुल्य ठरवतो. हा उत्कर्ष होण्यासाठी जो कालावधी लागतो तो कालावधी महत्वाचा आपण किती कालावधीत हा उत्कर्ष अर्जित केला त्या नुसार श्रेष्ठता ठरते . मुळात प्रश्न आणि जीव हा लपंडाव संपत नाही.हा लंपडाव संपाला तर आपण व्यक्तिमत्वा पलिकडे पोहचलो .म्हणजे आपल्या जीवनातील सगळ्या मोठा आणि महत्त्वाचा क्षण टप्पा आपण अर्जित केला . म्हणजे आपल्या स्वतःचा उत्कर्ष झाला.तत्पूर्वी प्रश्न त्यांचं चिंतन संपण हे एवढं सहज सोप नसत. प्रश्न असा आहे यावरून व्यक्तिच व्यक्तिमत्व प्रकट होते . वास्तविक सगळ्यांचे प्रश्न सारखेच असतात का तर नाही सगळ्यांचं प्रश्नांची उंची दिशा हि सारखी आहे का तर बिलकुल नाही. प्रश्न त्यांचं स्वरूप त्याच वास्तव अवास्तव त्याची दिशा यामुळे आपली बदलणारी स्थिती अथवा दशा हि आपल्या वेगवेगळ्या समस्यांचे मुळ असते . आपण समस्या पाहतो मुळ सोडुन देतो .मुळ सुधारल पाहिजे मुळ सुधारलं गेलं तर मग बाकी समस्या आपोआप संपुष्टात येतील. अन्यथा छोटे छोटे प्रश्न त्यांचं स्वरूप आपल्याला जीवनात निर्माण करतील.आणि एका मर्यादे पलिकडे ना आपला विकास होईल ना व्यक्तिमत्व विकास होईल म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व कस घडणार हे आपले प्रश्न निश्चित करतात म्हणून आपल्या प्रश्नांचा दर्जा उंची हि उत्तम असली पाहिजे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad