अपुर्णता
गावातील मित्रांची ती बैठक
पहिल्यासारखी बसत नाही
आता वाढ़ती जबाबदारी
जुन्या आठवणीनेंही उसत नाही
न ठरवलेला उपवास केव्हाच उपहासात
बदलत असे ते ही कऴत नसे
त्या ठिकाणाहुन पाऊलेही वऴत नसे
मनमोकळे बोलणे,हास्यांच्या लाटा
धड़ाधड़ पडणाऱ्या आपुलकीच्या गारा
हाच क्षण इथेच रहावा दुरावा नको
असा हवाहवासा वाटणारा ह्रदयस्पर्शी वारा
प्रत्येकाने निवडल्या आपल्या वाटा
अर्थ शोधण्या जीवनाचा
यातच झिजला तो रंगमंच
ज्यात सक्रीय सहभाग होता मनाचा