*सत्यनिष्ठ चिंतनातुनच तत्त्वज्ञानाचा जन्म होतो* .
. तत्वज्ञान हे अचानक अथवा हवाहवाई जन्माला येत नाही. सत्याची कास धरल्याशिवाय ज्ञानाच चिंतन होत नाही . चिंतन झाल्याशिवाय सत्यनिष्ठता येत नाही आणि सत्यनिष्ठता आल्या शिवाय केलेलं चिंतन हे तत्वज्ञान ठरत नाही म्हणून सत्य निष्ठा चिंतन हा तत्वज्ञानाचा पाया गाभा आहे.वेळोवेळी संतांनी जे तत्वज्ञान समाजा समोर मांडल ते तत्वज्ञान सत्यावर आधारीत असल्याने ते युग परीवर्तन करणार ठरलं.आज सुद्धा युग परिवर्तन होण्यासाठी सत्यावर आधारीत तत्वज्ञानी समाजाला गरज आहे.वाढत पाश्चिमात्यकरण बिघडत चाललेली सामाजिक संस्कृती व त्या प्रभावाने बदलत चाललेली मानसिकता आणि त्याचे वाढते दुष्परिणाम रोखाण्यासाठी लोकाभिमुख सत्यनिष्ठ तत्त्वज्ञान हेच प्रभावी ब्रह्म अस्त्र ठरू शकत .सामाजिक परिस्थिती जी आज झपाट्याने बदलत चाललेली आहे. सध्या तंत्रज्ञान युग हे जोरदार प्रगती पथावर असुन ती प्रगती कौतुकास्पद असली तरी माणुसकी,आपुलकी, आपलेपणा , जिव्हाळा, नातेसंबंध, आदरभाव,या सगळ्यांवर विपरीत परिणाम होऊन हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे दुर्भाग्य पुर्ण बाब आहे.मग माणूस म्हणून आपण काय मिळवलं याच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.आणि माणसाला खरंया अर्थाने माणूस बनवेल असं सत्यनिष्ठ तत्वज्ञान संतांनी निर्माण केलेलं आहे आपण ते स्वीकारणं गरजेच आहे .आणि उपलब्ध संत तत्वज्ञान बाराकाईने अध्ययन करण्याची सुद्धा आवश्यकता आहे.कारण कितीही कठीण सामाजिक परिस्थिती निर्माण झाली तर ती बदलण्याची ताकत हि फक्त संतांच्या तत्वज्ञानात मध्येच आहे. मग क्षेत्र कोणतही असो परिवर्तन हे फक्त तत्वज्ञाना मुळेच घडु शकतं म्हणून तत्वज्ञान हे अमर असत .युग परिवर्तन करण्याची ताकद हि फक्त सत्यनिष्ठ तत्वज्ञाना मध्ये असते .आणि लोकाभिमुख सत्याची अभिव्यक्ती असणार ज्ञान हे अमर असत. तत्वज्ञानाच समुद्र मंथन झाल्याखेरीज वैचारिक क्रांती घडत नाही. ज्या देशाच समाजाचं , कुटुंबाच तत्वज्ञान सत्यनिष्ठ लोकाभिमुख असतं . त्या ठिकाणी संस्कृती आणि संस्कार हे निवासी असतात . मुळात भारतीय संस्कृती हि साहित्यावर टिकुन आहे. सत्ययुग,ञेरतायुग, द्वापार युग या कालखंडात सुद्धा ऋषी मुनी यांनी वेगळ्या प्रकारचे साहित्य केले ते तत्त्वज्ञान म्हणून लौकिक पावले . म्हणून ते त्या त्या युगासाठी प्रेरणादायी तर ठरलेच पण आज आपल्यासाठी सुद्धा पथ दर्शक आहे आणि त्या तत्वज्ञानावरील मुल्यवरंरच आपण आपल्या जीवनातील अनेक बाबीचे अनुकरण करतो त्याच प्रमाणे विद्यमान कलयुगात सुद्धा नाथ संप्रदायातील नवनाथ भक्ति संप्रदायातील अनेक मान्यवर मंडळी , तसेच दरम्यानच्या कालावधीतील वेगवेगळे मान्यवर संत मंडळी यांनी लोक जे काही लोकउपयोगी तत्त्वज्ञान निर्माण केले आहे .ते आज लोकांना आपलं जीवन ज्ञान मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी कामी पडत आहे . आणि विद्यमान स्थिती मध्ये संत आणि विचारवंत यांचं एकंदरीत तत्वज्ञान हे लोकांना योग्य पद्धतीने संस्कृती संस्कार आणि वैचारिक पथावर टिकवून ठेवण्यासाठी कामी येत आहे . युग कोणतही असु द्या त्या युगाच्या परिवर्तनाची ताकद हि फक्त साहित्य मध्ये आहे .काल आज उद्या जेव्हा जेव्हा समाज परिवर्तन हा विषय समोर येईल तेव्हा तेव्हा साहित्य शिवाय सामाजिक परिवर्तन घडत नाही. म्हणून सामाजिक विकासासाठी साहित्य क्षेत्राचे अनमोल योगदान रहिलेल आहे. आणि आपली भविष्यातील पिढी संस्कृती हिन होणार नाही सामाजिक सलोखा, राष्ट्र प्रेम , कौटुंबिक जिव्हाळा, संस्कृती टिकून राहिल .या साठी साहित्य हा एकमेव आधार आहे.आणि भविष्यातील पिढी रक्षणासाठी लोकाभिमुख साहित्य निर्माण झालं पाहिजे. लोकाभिमुख साहित्य हे अमर असत .अमर साहित्य जास्ती जास्त निर्माण झाल पाहिजे . सध्याच्या काळात जो काही आधुनिकीकररणाचा फटका आपल्या सगळीकडे थोड्या फार प्रमाणात बसत आहे तो जर रोखायचा असेल आणि सामाजिक संस्कृती मजबूत करायची असेल तर संत तत्वज्ञान हे लोकाभिमुख होऊन ते आपल्याला अंगीकारावे स्वीकारावेच लागेल .
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301