Bluepad | Bluepad
Bluepad
दुष्काळाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी जलसाक्षरता आवश्यक
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
28th Feb, 2023

Share

*दुष्काळाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी जलसाक्षरता आवश्यक*
पाणी हे जीवन आहे पिण्यासाठी दैनंदिन विविध गरजांसाठी तसेच उद्योग व्यवसाय व शेती सह वन संवर्धन यासाठी पाणी आवश्यक व‌ महत्वाचा घटक आहे.दुष्काळा हे शेतकऱ्यांनच्या पाचवीला पुजलेल संकट आहे. शेती किती सुपिक आहे या पेक्षा शेतीसाठी पाणी किती उपलब्ध आहे. त्यावरून शेतीच उत्पन ठरत .शेती हि अखेर पाण्यावर अवलंबून आहे.मग पाणी या विषयावर आपण किती गंभीर आहेत अथवा पावसाचं मुबलक पाणी आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त आडवुन शेतीसाठी वापरू शकतो .याच गणित प्रत्येकाला समजलं पाहिजे.आणि नुसतं समजुन अर्थ नाही तर प्रत्येकाने स्वतःच्या शेतीला आवश्यक असणारं वार्षिक पाणी आडवलच पाहिजे.जल म्हणजे जीवन आहे . जलसाक्षरता हि वेळेसोबत काळाची गरज आहे .दुष्काळा हे जरी नैसर्गिक संकट असलं तरी आपण जल साक्षर होऊन त्यावर मात करू शकतो .भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि जास्तीत जास्त लोकांच जीवन शेतीवर अवलंबून आहे .शेती पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याचं आणि शेतीच योग्य नियोजन केलतर शेतीतील पिक अधिक अधिक प्रभावी पद्धतीने घेता शकते . शेती परवडत नाही अथवा नुकसानीत जाते हि संकल्पना जी रूढ झाली आहे त्या मध्ये नक्कीच परिवर्तन होऊ शकतं. नैसर्गिक संकट पाचवीला पुजलेला दुष्काळ ,त्यावर मात करण्यासाठी जल साक्षरता हि काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रातील विभागातील पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे.पाऊस पडताना सुद्धा तो शेतीच्या आवश्यकतेनुसार पडत नाही .पिकाला गरज असते तेव्हा नेमकं पाऊस पडत नाही अवकाळी पाऊस अवाजवी पाऊस पडतो .कधी कधी कमी पावसामुळे पिक नुकसान होत तर कधी कधी जास्त पावसामुळे नुकसान होत.याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम शेतीवर होतात शेती व्यवस्थित पिकली तर सामाजिक पातळीवर सगळेच व्यवहार व्यवस्थित होतात बहुतांश लोकांकडे शेती आहे.पण शेती चा मुख्य घटक पाणी याबाबत आपण किती साक्षर आहेत हे खुप आवश्यक आहे.शेती हा एक उद्योग आहे ही संकल्पना दृढ होण आवश्यक आहे.जो पर्यंत आपण शेतीला उद्योगाचा दर्जा बहाल करत नाही तोपर्यंत तसं नियोजन आपण करणार नाहीत. उद्योग म्हटल्यावर पायाभूत नियोजन व सुविधांचा विकास महत्त्वाचा असतो . पायाभूत सुविधा जितक्या विकसित तितकाच उद्योग प्रगतशील ठरतो .मग शेतीच्या संदर्भात आपण व्यक्तिगत अथवा सार्वजनिक नियोजन योजना आखत नाही .परिणामी शेती अजुनही निसर्गाच्या भरवशावर आहे.जो पर्यंत आपण जल‌साक्षर होऊन पाण्याचं योग्य नियोजन करत नाहीत तो पर्यंत शेतीला सोन्याचे दिवस येणार नाहीत.शेती पाणी याचा योग्य आराखडा गावोगावी वाडी वस्ती पाड्यावर तांड्यावर म्हणजे जिथे शेती आहे तीथ पाण्याचं योग्य नियोजन झालं तर भारत जगाला अन्न धन्या सह भाजीपाला तसंच विविध फळ पिक पुरवेल एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती आपल्या कडे उपलब्ध आहे.पण पाण्याचं योग्य नियोजन नाही महणजे आपण जल साक्षर नाहीत म्हणून शेतीच पाण्याचं योग्य नियोजन आपण करण्यात कमी पडतो . पर्यायाने याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होतो . सार्वजनिक व्यवस्थेवर होतो .जल साक्षरता हि व्यापक स्वरूपात आणि प्रत्येकाला समजली ,उमजली कृतीशील राबली तर शेती हा देशातील सगळ्यात जास्त महसूल देणारा उद्योग ठरेल या मध्ये दुमत नाही.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad