Bluepad | Bluepad
Bluepad
पारमार्थिक दिसण्या पेक्षा असणं गरजेचं
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
28th Feb, 2023

Share

*परमारर्थिक दिसण्या पेक्षा असणं गरजेचं*
सृष्टी वरील जीवमात्रांच हित स्वहिता पेक्षा श्रेष्ठ समजुन परोपकारी वृत्ती ने लोककल्याण करण्यासाठी निस्वार्थ भावनेने समर्पित भाव ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात कार्य करण. कार्य क्षेत्र कोणतही असेल महत्व क्षेत्राला नाही तर आपण तिथे कार्य करत असताना आपला भाव आपली वृत्ती आणि लोकहित लोक कल्याण होण महत्वाचं .कार्य करताना आपला भाव हाच अंतिम महत्वपूर्ण असला पाहिजे.लोक कल्याण लोक हित परकोपकार हेच सर्वपरी असल पाहिजे. स्व हित स्व कल्याण महत्वाकांक्षा,आशा , अपेक्षा स्वार्थ,मोह याचा एतकिंचत सुद्धा लवलेश नसला पाहिजे अशी स्वतःची वृत्ती तयार करणं अथवा असं व्यक्तिमत्त्व होण्यासाठी प्रयत्न करणं परमार्थ हा शब्द समजण्यासाठी सोपा तितकाच आहे जितका तो अवघड आहे. परमार्थ हा शब्द दिवसातुन अनेकदा, अनेक वेळा कित्येक वेगवेगळया ठिकाणी आपल्या कानावर पडतो . बहुतांश लोक मला परमार्थ करायचा आहे म्हणून नानाविध मार्ग शोधत आहेत.त्याचा अर्थ प्रत्यक्षात ज्याला समजला त्याला परमार्थ करण्याची आवश्यकता नाही.कारण परमार्थ हा दिसण्यासाठी नाही तर आपण स्वतः परमारर्थिक असलं पाहिजे मग दिसण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात इच्छा असते कि मला परमार्थ करायचा आहे. परमार्थ करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. हेच न समजल्यामुळे आपण परमार्थ करण्या ऐवजी परमार्थिक आहेत हे दिसण्यात धन्यता मानतो . दिसण्यासाठी अहोरात्र खटाटोप करतो. दिसण हे अंतिम उपयोगी नाही तरी सुद्धा असण्या पेक्षा दिसण्या मध्येच प्रत्येकाला जास्त ऋची आहे. दिसण आणि असणं यांच्या मध्ये जमिन असमानच अंतर आहे. तरी आपल्याला दिसायला आवडत पण कृतीमध्ये नको असत इथच आपण कमी पडतो .मी किती परमारर्थिक आहे हे दाखविण्यासाठी आपण अग्रेसर आहेत पण हिच अग्रेसरता असण्या मध्ये असली पाहिजे .आणि मुळात आपण इथंच कमी पडतो याचा अर्थ परमार्थ काय आहे .हाच आपल्याला आजुन तरी निट पणे समजलेला नाही .परमार्थ म्हणजे काय त्याच खरं सामर्थ्य काय हे समजलं कि आपलं जीवन लोक कल्याणासाठी समर्पित होत. सृष्टी वर आपण का जन्माला आलो हे तर कित्येक लोकांना न सुटलेले कोडे आहे . बहुतांश लोकांनी आप आपल्या सोयीनुसार अर्थ लावलेले आहेत.आपल्याला जो अर्थ समजला त्या नुसार आपण आपलं कार्य करत त्याच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा सपाटा लावलेला असतो‌. हाच सपाटा म्हणजेच मुळ अर्थ समजल्या शिवाय जो तो आप आपल्या सोयीनुसार आप आपल्या पद्धतीने विषाद करत आहे .मग खरा परमार्थ मुळ परमार्थ आपल्या पासून किती कोसो दुर अंतरावर आहे हे आपल्या लक्षात कधी येईल अथवा कुणी लक्षात आणून दिल तर ते आपल्या पचेल रुचेल आणि आपण ते मान्य करू का मग परमार्थ करण्याची इच्छा मनात असणं त्यासाठी प्रयत्न करणं आणि खरया अर्थाने परमारर्थिक होण या पैकी सोपं शाश्वत आणि खरं कोणत आहे.पण खरं खोटं हे कळलं तर बरोबर उत्तर येईल अन्यथा असत्याला सत्य मानुन धावण्याचा लावलेला सपाटा अशी जगी जाऊन थांबेल कि तिथुन पुन्हा परत फिरण्यासाठी फार फार काही पर्याय उपलब्ध नाहीत. खरया अर्थाने आध्यत्मिक जीवन परमार्थ या बाबी समजल्या तर खूप सरळ साध्या सोप्या आहेत. परमार्थ खरा जो शाश्वत परमार्थ आहे तो करणं तर सगळ्या उत्कृष्ट आणि सोपं आहे. फक्त परमार्थ आत्मियतेने केले पाहिजे तो मनापासून असला पाहिजे.दिसण्यासाठी केला तर मग मात्र फार काही उल्लेखनीय साध्य होईल असं निश्चितच नाही.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad