मला ना कधी कधी माणुस म्हणून माणसातला माणुसच कळत नाही. प्रत्येक माणसांचे स्वभावधर्म, त्याची सुख दुःख, प्रत्येकाच्या अडचणी ,त्यांची स्वप्न आणि ते पुर्ण करण्यासाठी लागणारी धडपड हे सगळं काही आपल्याच आजुबाजुला घडलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या सुद्धा आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्यांचे प्रतिबिंब बघितलेले असतात आणि म्हणूनच ती माणसं आपली वाटतात कारण सर्वांना होणार्या वेदना आपणही कधी तरी भोगलेल्या असतात किंवा भोगत असतो. म्हणुनच दुसर्याकडे जे आहे ते आपल्याकडे का नाही या वेदनेन कवटाळून स्वतःचा प्रवास का खडतर करावा..? माणसांचे ना काही कळत नाही आहे . चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी अशी ही माणसं असतात. म्हणूनच जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असला ना की आपल्यात वेगळेच बळ येते.
विकास आग्रे (विकी ) १६१४ ( २०/२/२३)