तात्या माझे मोठे चुलते...वयाने मोठे असलेले आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व. माझ्या वडिलांचे मोठे बंधू. माझे वडील सगळ्यात लहान असल्यामुळे त्यांचा खूप लाड करणारे असे तात्या. आज तात्या आमच्यात नाहीत. वयाच्या 81 व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचं 7 फेब्रुवारी ला निधन झालं..... माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले तात्या खूपच मनमिळाऊ स्वभावाचे. 5 फेब्रुवारी ला तात्यांची आणि माझी शेवटची भेट झाली. माझे लग्न झाल्यापासुनची ही पहिलीच निवांत भेट. मला नोकरी मुळे सारखे माहेरी जाणे जमत नाही. त्यात सरकारी नोकरी....त्या मुळे मुलं....सासर...संसार....या जबाबदाऱ्या आल्या. घरी कुणी बघणारे