Bluepad | Bluepad
Bluepad
उद्योग क्षेत्रातील चालतं बोलतं विद्यापीठ बुधाजीराव पानसरे
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
20th Feb, 2023

Share

*उद्योग क्षेत्रातील चालतं बोलतं विद्यापीठ बुधाजीराव पानसरे*
‌स्टिल उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य नाव अंबर फोर्ज प्रायव्हेट लिमिटेड नाशिक चे सर्वेसर्वा समुहाचे प्रमुख महाराष्ट्र भुषण खानदेश रत्न बुधाजीराव पानसरे एक चालत बोलत विद्यापीठ आहेत.उदयोग क्षेत्र म्हटलं कि प्रचंड अभ्यास, नावासमोर साधारणतः एक किलोमीटर संपादीत केलेल्या पदव्या असा आपलाच नाही तर सर्व साधारण माणसाचा समज असतो . पण अपवाद नाही असं कोणतही क्षेत्र नसतं .आपण यशाचा संबंध थेट उच्च शिक्षणासोबत लावतो .आणि आपला खरा मेळ इथंच फसतो आपण बिल गेट्स ची चर्चा करतो पण वीस वर्ष सलग पर्वत तोडत अखेर कठिण अशा पर्वताला सुद्धा रस्ता द्यावा लागतो आणि हा संघर्ष आपण सहजपणे दुर्लक्षित करतो . दैदिप्यमान इच्छाशक्ती खडतर संघर्ष, दैनंदिन मेहनत केली तर अशक्य अस काही नाही हे दशरथ मांझी यांनी सिद्ध करून जगाला दाखवल.पण आपण बिल गेट्स यांची आठवण ठेवतो आणि दथरथ माझीं यांची प्रेरणा विसरतो. बुद्धी कौशल्य ज्ञान हि अलौकिक संपत्ती आहे हि भगवंताच्या निसर्गाच्या कृपेने आणि प्रचंड अशा धेय्य कार्य शक्तीने स्वतःच अस्तित्व निर्माण करत असताना पदवी पेक्षा मेहनतीचा आणि अनुभवाचा कसं लागतो. आणि सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व्यक्ति देशाच्या पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक निर्माण करणारे साधारणतः फक्त मराठीत सही करण्या एवढ जेमतेम शिक्षण असताना देखील जागतिक पातळीवर भारताच नाव स्टिल उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत अमेरीके सारख्या प्रगतीशील देशातील वाहन उद्योग क्षेत्रातील स्प्रेअर पार्ट नाशिक येथील अंबड एम आय डी सी मध्ये निर्माण करत त्याचा दर्जा गुणवत्ता हि जगातीक पातळीवर टिकवून ठेवत यशस्वी उभारणी आणि दैनंदिन चढता वाढता आलेख हे बुधाजीराव पानसरे यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला सापडलेले अनमोल रत्न आहे. नाशिक जिल्ह्यातील अगदी शहर पासून काही अंतरावर असलेल्या भगुर सारख्या खेड्यात जन्मलेल्या एक शेतकरी पुत्र आपल्या प्रचंड अशा मेहनत कौशल्ययाने नामांकित उद्योगपती होतो हि आजच्या काळातील युवकांसाठी स्टोरी ऑफ सक्सेसच आहे. नाममात्र शिक्षण पदरी असताना देखील स्वतःच अस्तित्व सिद्ध करत . मेहनत जिद्द चिकाटी आणि खडतर संघर्ष केला तर अशक्य अस काहीच नाही. बालवयात स्वतंत्रवीर सावकार यांचा कहि दिवस सहवास लाभलेले बुधाजीराव पानसरे म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणिबाणीच्या काळात सुद्धा स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या समावेत नाशिक येथील कारागृहात कही दिवस देशाच्या हितासाठी तुरुंगात जाण्याची तयारी दाखवणारी आभाळ उंचीची माणसं या मातीला लाभली त्यापैकी बुधाजीवराव पानसरे हे अजब व्यक्तिमत्व एक शब्द म्हणजे एक पुस्तक माणसं ओळखयात पारांगत उद्योग आणि व्यवसाय चालवताना फक्त नफाच नाही तर माणसं कमवणारा हा उद्योगपती खरया अर्थाने महाराष्ट्र भुषण तर आहेच पण या देशाचं वंचित बहुजनांच अनमोल रत्न आहे. भविष्यातील कित्येक पिढ्या त्यांच्या कार्य तुन प्रेरणा घेऊन स्वतःच आयुष्य घडवतील इतक्याच आभाळ उंचीचे हे व्यक्तिमत्त्व उद्योग क्षेत्रातील टाटा मोटर्स किर्लोस्कर या नावांच्या जवळपास आपलं नाव टिकवून आहे आणि भविष्यात त्यांच्या संकल्पनेतून आणखी एक मोठा प्रकल्प आकारास येत आहे तो लवकरच पुर्णत्वास जाईल.पण वयाची सतरी ओलांडल्यावर सुद्धा काम करण्याची उमेद ताकद क्षमता तरूणाईला लाजवेल एवढा उत्साह त्यांच्या मध्ये ठासुन भरलेला आहे.महणुन त्यांची व्यक्तिरेखा हि पाहताच क्षणी प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही .
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad