Bluepad | Bluepad
Bluepad
report
K
KUNAL
20th Feb, 2023

Share

💚 Green Velentine Day 2023 💚
✓ REPORT✓
टीम तरुणाई ही गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण ,आरोग्य ,पर्यावरण आणि युवक या क्षेत्रात काम करत आहे. टीम तरुणाईच्या माध्यमांतून आपण 2023. यावर्षी पासून "Green Velentine Day" Celebrate करत आहोत. जे प्रेम आपण माणसांवर करतो तेच प्रेम आपण या निसर्गावर करूया. ..! पर्यावरण जापूया. ..! यासाठी आपण 5 फेब्रुवारी 2023 , सकाळी 06:30 ते 10 या वेळेत, बुद्ध लेणी वरील परिसर आणि गोगाबाबा परिसर औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ) येथे स्वच्छता मोहीम राबवली. यासाठी टीम तरुणाईचे 10 कॅम्पर तर उर्वरित 18 ते 20 जण स्व:इच्छेने आपल्या या मोहिमेत सहभागी झाले होते. आपली स्वच्छता मोहीमेची बुद्ध लेणी परिसरापासून सुरुवात करत. गोगाबाबा परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीमेचा शेवट करण्यात आला. या परिसरातून तब्बल 11 गोण्या प्लास्टिक आपण वरून खाली आणलं . आणि त्याची योग्य पद्धतीने विलहेवाट सुद्धा लावली. हे सर्व करत असताना आपण आपल्या कामाचा व्हिडिओ सुद्धा बनवला. आणि तो ग्रुप वर पण टाकला. हे सर्व काम आमच्यासाठी नवीनच होतं. पण ते चांगल्या पद्धतीने झालं. या कामाची दखलं तब्बल 11 प्लस न्यूज पेपर नी घेतली. पण याही पेक्षा आपण करत असलेलं काम परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. याचं एक वेगळंच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे.
आपण आणखी एक कार्यक्रम 14 फेब्रुवारी, रात्री 8 वाजता, ग्रीन व्हॅलेंटाईन डे निमित्त घेतला होता. यामध्ये आपण माणसांवर, पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या आणि चौकटी पलीकडचं आयुष्य जगणाऱ्या "वैभव विमल गणेश" ची मुलाखत आपण घेतली आहे. त्यासाठी आपलं अनेक दिवसापासून त्याच्याशी बोलणं सुरु होतं. नंतर पोस्टर बनवलं गेलं. ते सगळीकडे फॉरवर्ड सुद्धा केलं . याही कार्यक्रमाला जवळपास 30 जण उपस्थित होते. आपण ही मुलाखत ऑनलाईन पद्धतीने "झूम मीटिंग "या ॲप वर घेतली. या वेळी अनेक पर्यावरणाची आवड असणारी आणि निसर्ग जपणारी वेगवेगळ्या शहरातली माणसं आपल्याला भेटली. ते ही आपल्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. सोबतच आपण ही मुलाखत रेकॉर्ड केली आहे. 1 तासात आपण ही मुलाखत संपवणार होतो. पण आपल्याला जॉईन झालेल्या माणसांचा उत्साह पाहून आपण ती 01:40 मिनिटे सुरू ठेवली. शेवटी वेळ संपल्यामुळे, आणि वैभवलाही दुसरी मीटिंग असल्यामुळे आपण ती थंबली. अनेक जण आजही आपल्या संपर्कात आहेत. ही आमचीही पहिलंच वेळ होती मुलाखत घेण्याची ती आम्ही चंगल्या प्रकारे घेतली. आणि हे काम करत असताना जो अनुभव, आनंद आहे ना तो अद्वितीय आहे .

0 

Share


K
Written by
KUNAL

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad