लहापणापासूनच आम्ही हे वाक्य ऐकत आलो ' लोकं काय म्हणतील ?' आमच्या आईचे आवडतं वाक्य... कशालाही चालायचं...मार्क कमी आणले, मैत्रणी बरोबर जरा रात्रीच बाहेर जायचं ठरवलं ( रात्र म्हणजे संध्याकाळी ६.३० वाजता) तरी ' लोकं ' आडवी यायची... नवीन पद्धतीचे कपडे घातले तरी लोक.... लिपस्टिक लावली तरी.....
मग आमची पिढी मुलांवर संस्कार नावाचे बंधन घालताना.... आपल्याला जे काही त्यांच्या कडून हवंय ते लोकांच्या नावावर खपवायच ( हे आमचं डोकं) . थोडक्यात मुलं मोठी होताना मोबाईल नामक यंत्र विकसित झाले, मुलांचे DP मध्ये मुलगा दोन तीन मुलींबरोबर दिसला किंवा माझी लेक कॉलेज फ्रेंड बरोबर दिसली तरी... अगं तो DP पहिला चेंज करा....लोक काय म्हणतील... मुलांना कळायचं आईला काही प्रॉब्लेम नाही पण आई लोकांसाठी म्हणतेय ' उगाचंच नको' ( अर्थात तेव्हा मुलं लहान होती आपलं ऐकत होती... कोणे एके काळी ). मग मुलचं सांगायला लागले ' आई चील मार. लोकांना एवढा वेळ कुठे असतो बघायला? तू उगाच त्यांची काळजी करतेस '. कळलं मुलं मोठी झालीत...
काल एफबी वर एक ' मुंबई स्वयंपाकघर ' नावाचा ग्रुप आहे तिथे एकीने टाकले आहे, कोणी कधी कुठलीही रेसिपी टाकली की चार लोकं चांगले बोलतात, बाकीचे टीका करत असतात ....तुम्ही असे नका करु, कोणालाही प्रोत्साहन द्यायला शिका त्यांच्यावर कमेंट्स करण्या पेक्षा... हेच ते ' लोकं ' जे रिकामटेकडे असतात...आपण काहीच करायचं नाही पण दुसऱ्याने केलं तर त्याचा पाय खेचायचा... एवढा की तो परत उठता काम नये... का अस का वागतात ' लोकं '?
बऱ्याच जणांनी सांगितलं,' अल्युमिनियम भांडी का वापरतात त्याने कॅन्सर होतो कळतं नाही का?' ' प्यायच पाणी प्लास्टिक बॉटल मधून का पितात काचेच्या का नाही वापरत?' ' ह्या जेवणात हा पदार्थ का टाकता , ते किती भयानक दिसतं? तुमचं किचन अस्ताव्यस्त दिसतंय अस का तुम्हीं साफ का नाही ठेवत? केस बांधून जेवणं करतं जा... असे अनेक कॉमेंट्स...
आम्ही त्यांना रिप्लाय देतो, अल्युमिनियम वापरलं तरी लगेच पदार्थ शिजल्यावर आम्ही काचेच्या किंवा स्टील मध्ये काढतो तो पदार्थ. घरात म्हातारी माणसं आहेत आणि मुलं म्हणून काचेच्या बाटल्या वापरत नाही....अशी अनेक उत्तर.... का द्यायची? आपण लोकांना एवढ महत्व का देतो?????
एकीने सांगितलय ' ह्या लोकांच्या घरी सरळ ना सांगता जायचं आणि बघायचं की ह्यांची घर कशी आहेत? जेवणं कस आणि कशात बनतं? ओटा साफ आहे का? काचेच्या बाटल्या आहेत का? मग ह्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे....
एकदम बरोबर...' आपलं ठेवायचं झाकून... दुसऱ्याच पहायचं वाकून '..... ही आपल्यात म्हण आहे, जी अश्या लोकांना चपलख बसते... एखादी किंवा एखादा छान मन लावून पदार्थ बनवतो, सजवतो आणि आपल्या सामोरं ठेवतो...कसा झाला आहे पेक्षा त्यामागे मेहनत किती आहे हे लक्षात ठेऊन...छान, उत्तम दिसतोय, नक्कीच चवीला छान झाला असणार, आम्ही प्रयत्न करु असाच करायचा...हे रिप्लाय बनवणाऱ्या व्यक्तीला समाधान देतात, त्यांचे श्रम वाया जात नाही....एवढं पणं आपण करू शकतं नाही का????
ऑफिस मधून ट्रेनच्या गर्दीतून दमून आलेल्या माणसाला, घरी आल्यावर एक ग्लास पाणी पुढे कराव, गरम गरम चहा द्यावा, हे जस तुम्हीं अपेक्षित ठेवता तसच.....हे पण असतं.... तेव्हा टीकेच्या आधी हा विचार करा की दमलेल्या तुम्हाला दरवाजा उघडल्यावर ' आली कटकट घरी असा चेहरा केला तरं कसे वाटेल.... तसच... म्हणून जिभेवर साखर ठेऊन जरा बोला....हीच आमची अपेक्षा.
🙏 वंदना ❤️