शाळेच्या आठवणी, घेऊनी गेले मला तिच्या आवारात...
शोध तुझ बालपण.. लपलाय या माझ्या परिसरात|
सोडूनी गेलास तु एकाएकी, एकदा तरी भेट नाही दिलास...
सर्वच करतात असे माझ्यासोबत.. त्यात तु पणं तसचं निघालास|
शाळेतून ज्ञान कमी, पणं जीव लावणारे मित्र कमवलेस
या स्पर्धेच्या युगामुळे, हळू-हळू त्यांना पणं गमवलेस|
56 भोग पेक्षा श्रेष्ठ, माझा तो पोषण आहारचं होता
मित्रा सोबत खाण्याचा, तो तुझा वेगळाच प्रेम होता|
जास्त वेळ शिकायला, त्रास का तुला यायचा?
कधि कधि मध्येच सोडून मला, घरी का पळायचा...
खेळण्यासाठी तुला इतकं वेळ कसं मिळायचा...
सुट्टीच्या पणं दिवशी शाळेत तू दिसायचा|
तुझ्या त्या सुवर्ण क्षणाला मी ठेवले आहे जपून,
पुन्हा तु कधि येशिल? मला भेटायला परतून..
हे ज्ञानाच्या महासागरा पडलो जरी असेल तुझ्या बाहेर मी,
पणं तुला विसरणे माझ्यासाठी सोपे नाही...
येईल पुन्हा भेटायला तुला आताच जीवन माझे संपले नाही|
जरी गेले असेल ते दिवस पणं आठवणीं जपले आहे,
तुला हृदयात माझ्या प्रथम स्थान दिले आहे|