आपल्या मुलांना फक्त पाठ्यपुस्तक गुंतवुन न ठेवता अष्टपैलू बनवा
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
20th Feb, 2023
Share
*आपल्या मुलांना फक्त पाठ्यपुस्तकात गुतंवुन न ठेवता अष्टपैलू बनवा*
मुलांच भविष्य सुरक्षित व्हावं हि प्रत्येक पालकांची मनोमन इच्छा असते .हि पालकांची इच्छा अगदी रास्त असते .आपल जीवन अडचणी समस्या मध्ये गेलं किमान मुलांच्या वाट्याला हे सगळं न येता किमान मुलांच्या वाट्याला तरी सुख यावं हि त्या मागिल सुद्ध भावना असते .आपल्या मुलांना सुख मिळावं हि अपेक्षा ठेवुन पालक स्वतः प्रचंड मेहनत कष्ट करतात.मुलांच्या शैक्षणिक खर्चला पालक कुठेही कमी पडत नाहीत.मग पालक गरिब असो वा श्रीमंत आप आपल्या ऐपतीप्रमाणे मुलांच्या अडचणी सोडवतात. पालकांनची अहोरात्र धडपडत हि नुसती असुन चालणार नाही .तर पालकांच्या धडपडीला योग्य नियोजन व मुलांची प्रभावी साथ खुप आवश्यक आहे. मुलांना घडवत असताना फक्त पुसतकांच ओझं आणि त्या ओझ्याखाली दबलेली मुलं असंच कहिस समिकरण सध्या सचित्र आहे .यातुन योग्य मार्ग काढण थोडं जिकिरीचे असल तरी त्यातुन मार्ग काढत आपल्या मुलांना अष्टपैलू घडवलं पाहिजे. चिखलाचा गोळा जसा आकार देवु तसा घडतो . लहान मुलं हि जवळपास चिखलाच्या गोळ्या सारखीच असतात .आपण चिखलाच्या गोळ्याला आकार देताना घेतलेली मेहनत त्या मधुन तयार होणा-या वस्तूंची दिव्यता निर्माण होते .तसंच लहानपणी बाल वयातील मुलांना त्यांच्यातील कलागुणांना ओळखुन आपण त्यांना सर्व संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत . म्हणजे एखाद्या क्षेत्रातील त्यांचं दिव्यत्व आपोआप प्रकट होऊन ते यशोशिखरावर गाठतील. आपल्या मुलांच आयुष्य घडविण्यासाठी आपण त्यांना अष्टपैलू बनविण्याची आवश्यकता आहे . जेणेकरून मुलांच भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविणे गरजेचं आहे.लहान वयातच मुलांच्या मनातील प्रतिभा ओळखा त्यांना वाव द्या संधी द्या त्यांच्यावर विश्वास टाका आणि फक्त पुस्तकात गुंतवुन न ठेवता अष्टपैलू कस घडवता येईल कडे प्रामुख्याने लक्ष द्या मुलं अष्टपैलू होण हि आजच्या युगाची खरी गरज आहे.प्रत्येक व्यक्ती मध्ये असंख्य कालगुण असतात आपण ज्या कलागुणांना वाव देवु संधी देऊ ते कलागुणा बळकट होण्यास सुरुवात होते व शेवटी त्या कलागुणांचे त्या क्षेत्रातील दिग्गजांत रूपांतर होते . म्हणून योग्य वेळी कालगुण ओळखुन संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.मग क्षेत्र कोणतही असेल त्या क्षेत्रातील दिग्गज हा बालपाणापासुनच घडत असतो . म्हणून आपल्या मुलांना बालपणापासून फक्त पुस्तकात न गुंतवता त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवा . शहरीकरण झपाट्याने वाढत आहे . त्याच प्रमाणात निसर्गाचं संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे त्याचे अनेक दुष्परिणाम मुलांच्या शारिरीक रचना व सामर्थ्यवर कोणत्याही परिस्थितीत होऊ नयेत तसेच नैसर्गिक प्रदुषणा मुळे निर्माण होणा-या शारिरीक समस्यांचा सामना करेल आशी शरिर रचना मुंलाची व्हावी यासाठी त्यांना मुक्तपणे मैदानावर खेळु दिलं पाहिजे. त्याच बरोबर मुलांन मध्ये असणारी वेगवेगळी गुण कौशल्य प्रकट होण्यासाठी त्यांना बाल वयापासुन अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी संधी दिली पाहिजे. शिक्षणासोबतच मुलांना अष्टपैलू होण्यासाठी वाव देण अथवा तसं वातावरण उपलब्ध करून देणं पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे. फक्त शाळा दप्तर पुस्तक अभ्याक्रम ,शिकवणी या पालिकडे सुद्धा वेगळं जग आहे .आणि त्या जगाचा मुक्त आनंद योग्य वयात मुलांना घेउ दिला पाहिजे . त्यासाठी मुलांना अष्टपैलू घडविणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस बदलती जीवनशैली बदलती शिक्षण पद्धती ,वाढती लोकसंख्या या सह अनेक व्यक्तिगत तथा सार्वजनिक समस्या निर्माण होत आहेत या सगळ्या मध्ये आपली मुलं प्रत्येक पातळीवर प्रत्येक टप्प्यात टिकली पाहिजेत आणि टिकण हे काळाची गरज त्या साठी आपली मुलं प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी परफेक्ट असली पाहिजे त्या साठी फक्त पुस्तकात न गुंतवुन ठेवता अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवा . म्हणजे स्वतःच्या विकासा सोबतच राष्ट्र हितार्थ ती उपयोगी पडतील.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301आपलय
0
Share
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक