आपण जेव्हा जिथे चुकतं असतो तिथे आपण स्वतःची चूक कबूल केलीच पाहिजे किंबहुना स्वतःशीच संवाद झाला पाहिजे स्वतःला बजावलं पाहिजे परत अशी चूक पुन्हा होणे नाही त्याची खंत लागून राहण्यापेक्षा आपण त्याबद्दल व्यक्त होणं केव्हाही उचीत असतं मग ती चूक क्षम्य असेल किंवा नसेल त्याची स्वतःला जाणीव होऊन परिमार्जन होणे खूप गरजेचे असते हेच सुज्ञ माणसाचं लक्षण आहे