जगण्याच्या वाटेवरी कुठं तरी थिंबावं
आहे काय?स्वतःमध्ये थोडसं पहावं
न ठेवता आस कशाची स्वतःत मिळावं
कुठं तरी हृदयात मला स्वतःला च शोधावं
स्व चारोळ्यांनी जीवन बदलाव
कुठं तरी मनातील विचारांना बाहेर आणावं
प्रेम प्रीत सर्व ईथंच शोधावं
स्वतः मनाला काही तरी प्रश्न विचारावं
दूर नाही शोध घेण्या मनातचं थांबावं
कुठं तरी स्वतः च स्वतःला प्रश्न करावं
संजना पाटोळे