शिवनेरीवर बाळ जन्माला
काळ रात्रीचा काळ ठरला
नमविले जुलमी अंध सत्तेला
अन्याय अत्याचार संपविला
जमवूनी मराठमोळे मावळे
स्वराज्य स्थापन केले
प्रजेचा पुत्रवत करी सांभाळ
जिजाऊचा प्रेमळ शंभू बाळ
शत्रूला भयंकर वाटे धाक
साधुसंत सज्जनांचा कैवारी
गो ब्राम्हण प्रतिपालक
स्वराज्य रक्षण करी
शीलवंत कुलवंत विराजमान
जन सिंहासनी राज्य करी
परस्त्री मानी मातेसमान
दुष्टांना कठोर शासन करी
असा राजा नाही जगती
न भूतो न भविष्यती
अशी ज्याची थोर कीर्ति
किती कुणी वर्णावी महती
उर्मिला आपटे, सातारा.