Bluepad | Bluepad
Bluepad
प्रवाह
Swapnil Bhovad
Swapnil Bhovad
19th Feb, 2023

Share

प्रवाह
सुखकारक प्रवाहात पुनःश्च व्हाहून जात असताना डिजिटल दुनियेला राम- राम केलं होतं.
दोन - तीन महिने सोशल मीडिया , मोबाईल ,करमणूक ह्यातून दूर झालो . तेव्हा कळल की आपण किती गुंतलो आहोत. डिजिटल विश्वात !
किती घातक आहे हे सर्व ...हा डिजिटल विश्वातला प्रवाह ...वेळेचे भान च ठेवून देत नाही . रिल्स ,पोस्ट , चॅटिंग आणि इतर बाबी आपल्याला ध्येयापासून वंचित ठेवतात.
चल-बीचल दुनियेतल आपण खेळणं बनून राहतो. युट्यूबवर गाणी व्यतिरिक्त अनेक माहितीदायक पॉडकास्ट असतात. प्रसिध्द प्रभावशाली पुस्तके , विश्वातील इतिहास , तंत्रज्ञान विकसित माहिती असते. गुगल सारखा मार्गदर्शक अनेक समस्या दूर करण्यासाठी सदैव तत्पर असताना.
त्या पांचट रिल्स , स्टोरी मध्ये आजचा तरुण भरकटलेल्या अवस्थेत दिसत आहे. स्टेटस , स्टोरी , आणि पोरी हेच ध्येय साध्य करण्यासाठी हा अट्टहास असेल बहुधा !
जर तुम्ही विचार केलात तर तुमच्या हातांची बोटे ते मोबाईल च वजन उचलून आता कंटाळवाणी झालेली आहेत असे दिसेल. त्यात थोडीशी वाकडी पण झाली असतील.
सेल्फी घेण्याची आवश्यकता खरंच आहे का ?
त्या पाऊट ची तर गोष्टच वेगळी...ओठांवर चा बलात्कार च म्हणा ना !
मी , मोबाईल आणि सोशल मीडिया हेच आयुष्यभर आपण करणार आहोत का ?
आपल्या जीवनाचा हाच प्रवाह आहे का ?
जीवनात अनेक अमूल्य बाबी आहेत. आपण खरंच भरकटलेल्या अवस्थेत नाही ना ?
मग जीवनातील मुख्य प्रवाहात येण्यासाठी तुम्हा सर्वांना दुरावा साधावा लागेल. डिजिटल विश्वातला आणि सोशल मीडिया चा............
नाहीतर हे भूत झपाटल तर ....गुगल बाबा पण उतरवणार नाही..
©स्वप्नाळू✒️🔥

1 

Share


Swapnil Bhovad
Written by
Swapnil Bhovad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad