ज्ञानाचा सागर असलेली माझी शाळा
मित्रांनो आपण शाळेत शिकत असताना खुप काही आठवणी निर्माण केलेलं आहोत. त्याचं आठवणींना स्मरण करून मी लेख सादर करत आहे.
शाळा तुमची असो किंवा माझी आपण काही आठवणी तर बनवल्या आहेत च . शाळेची किंमत मला शिकताना नाही कळाली जेव्हा मी बाहेर पडालो तेव्हा कळाली. ते म्हणतात ना जी व्यक्ती/वस्तू आपल्याला सतत दिसत असते तिची किंमत नसते ती जेव्हा आपल्यापासून दूर होते तेव्हा कळते माझ्यासोबत तसच घडल
माझी शाळा ही एक प्रकारची नंदनवनचं, निसर्गरम्य वातावरण, खेळण्यास मोठे मैदान, रंगीबेरंगी फुलांचा बाग, हिरवी गार मोठी झाडे, जे आपल्याला हवं होत ते सर्वच मिळालं