Bluepad | Bluepad
Bluepad
लक्ष्य गाठताना... जीवनाचं केलेलं बलिदान 😟
Kúñál Kápàt
Kúñál Kápàt
19th Feb, 2023

Share

कधीही अभ्यास न करणारा मी आता फक्त अभ्यासाला बसतोय
सकाळी 9वाजता उठणारा मी आता पहाटेला उठतोय
खेळण्यात दिवस घालवणारा मी आता खेळायला विसरतोय
मित्रासोबत वेळ घालवणारा मी आता त्यांना वेळ नाही देवु शकतोय
टेंशन मुक्त असलेला मी आता रात्री विचार करत करत झोपतोय
नेहमी हसत असणारा मी आता तिला कुठे तरी लपवतोय
या स्पर्धेच्या युगात मी स्वतःला कुठे तरी हरवतोय
दुसऱ्यांना जगण्याची वाट दाखवणारा मी स्वतः ती आता शोधतोय
रोज असे वाटते मला हे फक्त एका नोकरीसाठी करतोय
नोकरीच्या नादामध्ये सर्व काही मागे-मागे सोडतोय
आता असे वाटते की हे सर्व सोडावे,
हिच वेळ आहे आता मनसोक्त जगावे,
जगण्याच्या नादात जबाबदाऱ्या जाईल विसरून
मग कष्ट करावे लागणार अंगावर पिडा घेऊन
आता हीचं वेळ आहे फक्त लक्ष्याच्या मागे लागतोय
या काही अवधी मध्ये माझे लक्ष गाठतोय.....
हे सर्व काही.. मला मन माझा करवतोय
काय झालं? काय माहित? का हा असा करतोय..
कवी: कुणाल कपाट

0 

Share


Kúñál Kápàt
Written by
Kúñál Kápàt

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad