कधी येशील तू... मी वाट पाहतोय,
या हृदयाला कितीदा तरी सावरतोय|
तुझ्याच स्मरणात हा दिवस-रात्र राहतोय,
रोजचं हा उगा-उगा दाराकडेचं पाहतोय|
तुझ्याविना मला नाही भूक-तहान लागेना,
तुला बघितल्या शिवाय माझं हृदय काही मानेना|
तुझ्याहून मला आपले जुने दिवस आठवले,
त्या सुवर्ण क्षणाला मी हृदयात साठवले|
आता येशील तू... मी तुला दुर नाही जाऊ देणार...
धरेल तुझा हात... जीवनभर नाही सोडणार...
बघता बघता किती तरी दिवस उलटून गेले,
आज येशील या आशेने प्राण निघून गेले|
येशील तू नक्की अस हृदय माझा म्हणतोय,
कधी-कधी हा नादान चुकीचा पण ठरतोय|
श्वास असे पर्यंत बघणार तुझी वाट....
तू येई पर्यंत ठेवणार याला थाट...
कधि ना कधी सोडेल हा माझा साथ...
तेव्हा तरी येशिल काय?
मला अखेरची भेट देशील काय?
या आत्मेला मुक्त करशील काय?
माझी ही आखरी इच्छा.. पूर्ण करशील तू....
वाट पाहतोय मी.... कधी येशील तू.....
कवी: कुणाल कपाट