अजूनही श्वासात नाव तुझे आहे,
अजूनही जगण्यात गाव तुझे आहे..
अजूनही हृदयात प्रेम तुझे आहे,
अजूनही ओठांवर गीत तुझे आहे..
नसूनही हातात तुझाच हात असतो,
अजूनही जगण्यात तुझाच भास असतो..
अजूनही राजा मी तुझीच वाट बघते ,
अजूनही प्रत्येक क्षण तुझ्याचसाठी जगते..
अजूनही प्रत्येक क्षण तुझ्याच साठी जगते...