शिवरायांचे आठवावे रूप! शिवरायांचा आठवावा प्रताप! शिवरायांचा आठवावा साक्षेप! भूमंडळी!!
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ! काय आणि किती वर्णावी किर्ती!19 फेब्रुवारी ला फक्त महाराष्ट्रचं न्हवे तर जगभरात अनेक ठिकाणी छत्रपतींची जयंती साजरी केली जाते. पण हीच जयंती साजरी करताना आपण कुठेतरी आपले संस्कार विसरत चालल्याची खंत कुठेतरी जाणवतीये.
लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं स्वराज्य पिढ्यानपिढ्या जपलं जावं , त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी , या हेतूने शिवजयंती साजरी करण्यास सुरवात केली, परंतु सध्याच्या तरुण पिढीत तो उद्देश जपला जातोय का हा प्रश्न याठिकाणी निर्माण होतोय.
स्वतः ला शिवभक्त म्हणवून घेणारे आम्ही शिवजयंती जवळ आल्याच्या आधी आमच शिवप्रेम जाग होतय, तर अशी शिवभक्ती काय कामाची , एक दिवस शिवप्रेम दाखऊन दुसऱ्या दिवशी आम्ही वाईट कृत्ये करायला मोकळे होत असू, छत्रपतींच्या प्रतीमेसमोर गाण्यांच्या तालावर आम्ही मदयधुंद होऊन नाचत असू, तर अशी शिवभक्ती काय कामाची?
गनिमांशी झुंज देऊन त्यांना तलवारीच्या वाराने जेरीस आणणारे होते छत्रपती आणि त्यांचे मावळे. महाराजांच्या कर्तृत्वाचा गर्व करण्यापेक्षा त्यांचं आचरण करणारे शिवभक्त होण सध्या गरजेचं आहे, शिवचरित्र आचरणात आणणारा मावळा होणं गरजेच आहे. जेवढं प्रेम आपण महाराजांवर दाखवतोय तेवढच ते आईवडिलांवर दाखवणारा शिवप्रेमी होण गरजेचं आहे.
शिवराय तर होणे नाही पुन्हा, पण त्यांचा सच्चा मावळा होण्याचा प्रयत्न करूया .....!