आजही मी पुन्हा पुन्हा, त्या ठिकाणी जातो
पाहिलं तुला पहिल्यांदा ते वळण पुन्हा पाहतो
बसतो तिथे काही क्षण अन वाट तुझी पाहतो
शब्द काही मनातले मग कागदावर उमटतो
तू ही तिथे येतेस रोज ती सांजवेळ सरताना
चोरून तुला पाहतो मी गालात तू हसताना
कारण, तो असतो सोबत तुझ्या हातात त्याच्या हात तुझा
पाहून तूला सोबत त्याच्या विरहात झुरतो जीव माझा ...
🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤
✍️ दत्तात्रय भोसले