Bluepad | Bluepad
Bluepad
🚩🚩शिवजयंती का ?🚩🚩
Aher Vaibhav.....
Aher Vaibhav.....
19th Feb, 2023

Share

🚩🚩शिवजयंती का ?🚩🚩
आज खूप दिवसांनी शिवजयंतीच्या पावन दिनी लेख लिहित आहेत. प्रथमतः तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
आज तुम्ही सर्वांनी अतिशय उत्साहात महाराष्ट्राचे आाध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली असेल.आजचा उत्साह कुणाला शब्दात तर व्यक्त करता येणार नाही पण ,तो निराळाच आहे, हे तर अटळ सत्य आहे.
शिवजयंती म्हंटले की ,शिवजयंतीची तयारी दोन ते तीन आटवडे अगोदरच चालू होते .वर्गणी गोळा करणे, डीजे बघणे, भगवा ध्वज घेणे, साजसजव, वक्ते बोलावणे यांसारखे खूप सारे काम केली जातात.
आखेरकर शिवजयंतीचा पावन दिवस येतो. आपण सकाळपासून मिरवणूक काडणे, शिवगर्जना करणे, व्याख्यान एकणे, यांसारखे कितीतरी कार्य आपण करतो. येवढे सर्व कार्य आपण उत्साहाने करतो. परंतु शिवजयंती साजरे करण्याचा उद्देश येवड्यापर्यंतच असतो का? हा प्रश्न पडतो का कधी आपल्यांना . नाही पडत ना, का नाही पडत याचे कारण तरी शोधण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.
शिवजयंतीच्या निमित्ताने आपणास शिवरायांचे कार्य , त्यांचे विचार , आचार, गुण , बुद्धिमत्ता, रणकौशल, राजनीती, न्यायप्रियाता , दूरदृष्टीकोण , यांबाबत अवगत करून दिले जाते.
शिवजयंती साजरे करणे म्हणजे एक दिवस जयघोष देणनाही, तर शिवरायांचे विचार महणजेज शिवविचार ग्रहण करुन त्यांचे अनुकरण करणे होय. आपण संकल्प घ्यायला हवा की शिवरायांचे अनुकरण आपल्या रोजच्या जीवनात करूच. पूर्णे पणे जरी शक्य नसले तरी काही प्रमाणात तरी आपण ते करू शकतोच:
  • कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
  • जर माणसाकडे आत्मशक्ती असेल,तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
  • सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक,मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
  • कधीही आपले डोके वाकवू नका,नेहमी उंचावर ठेवा.
  • ज्याचे विचार मोठे असतात.त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.
  • असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,खरी वीरता विजयात आहे.
  • महिलांचा आदर करा.
छत्रपतींचे आपण काही प्रमाणात जरी अनुकरण करू शकलो तर आपले जीवन सार्थक होईन.छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा.
जय भवानी || जय शिवाजी

0 

Share


Aher Vaibhav.....
Written by
Aher Vaibhav.....

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad