पिकल नाही म्हणुन,
उगीच मरायच नसत,
दौऱ्याचा कासरा करुन,
जगायच आसत.
स्पर्धेच्या काळात,
माग सरायचे नसत,
कसबस जीवन हे,
जगायच आसत.
ताट नही म्हणुन,
भाकरी फेकायची नसते,
पळस पानावरही तीची चव ,
चाखायची असते.
जीवन आसच आसत,
त्याला भीयाच नसत,
शेतकरी भावांननो,
यातुनच नवीन काही,
घडवायच आसत.....
घडवायच आसत.
===============
सुधीर बी. पिंपळे
मु.पो.तांदळा ता. माहुर जी. नांदेड.
ह. मु. पो. गोंकुदा किनवट.
एकवीरा देवी मंदिर रोड, साईकीराणा समोर,
,." आंबेगाव भवन"
विदया नगर, किनवट. जी. नांदेड.
431811.
==============