जय जय शिवराय ...
जय जय शिवराय...
काळजात कशी फणसाची गर ,
वरून चढला काटेरी थर ,
डोळ्यांत धगधगत्या मशाल,
चेहरा हा प्रसन्न प्रभा ,
पाहता तुला मी न उरलो माझा,
आठवा हो हा रयतेचा राजा,
विसरू देईल कसा संस्काराची पुजा,
उधार ना ठेवली त्यांने गवताची काडी,
प्रजेसाठी तो दिनांचा कैवारी ,
शिवबा माझा , माझा राजा ,
कर डोळे बंद ,
आवाज ऐक मनाचा आज ,
नसांनसात सळसळणारं रक्त म्हणते काय ?,
जय जय शिवराय ...
जय जय शिवराय...
माता बहिणीचा करी नेहमी आदर,
माँ जीजाऊ ची अशी शिकवण,
जीव माणसांना लावला ,
जीवाच्या माणसांनी ,
राजासाठी प्राण पणाला लावला ,
एक एक जीव अनमोल राजा बोलला,
काळजी करणारा राजा,
बाप आमचा झाला ,
वंश मराठ्यांचा आम्ही ,
बोलु अमृत मराठी बोलु,
संस्कार मनात जागवु ,
नको डाग माझ्या वंशाला,
अपमान नको मराठीचा माझ्या,
कर डोळे बंद ,
आवाज ऐक मनाचा आज ,
नसांनसात सळसळणारं रक्त म्हणते काय ?,
जय जय शिवराय ...
जय जय शिवराय...
ओळखु दे स्वतःला ,
डोळे घालून उत्तर दे जीवनाला,
थकला नाही तु अजुन ,
श्वासांचे उपकार फेड तु,
कर सार्थक जीवन तुझे,
घे प्रण हरणार ना प्रयत्न तुझे,
तु आहे शिवबाचा मावळा,
चाल रे गड्या ,
तुच तुझा शिल्पकार ,
कर डोळे बंद ,
आवाज ऐक मनाचा आज ,
नसांनसात सळसळणारं रक्त म्हणते काय ?,
जय जय शिवराय ...
जय जय शिवराय...
सौ. मनीषा आशिष वांढरे ...
चंद्रपुर ...
सर्वांना शिवजयंतीच्या खुप खुप शुभेच्छा💐💐💐