मी एकदा माझ्या सोसायटीत सायकल चालवत होतो तेव्हा माझा मित्र शार्दुल मला दिसला. मी त्याला हाक मारली आणि त्याच्याकडे गेलो. थोड्यावेळ गप्पा मारल्या. मग तो मला म्हणाला, "वेद, तुझ्या आईला विचार की इथे एक जवळ शाखा आहे तर मी शार्दुल बरोबर जाऊ का." मी माझ्या आईला विचारतच होतो की तेवढ्यात तो वरती आला तेच विचारण्या करता की वेद म्हणजे मी शाखेत जाऊ शकेल का. आई म्हणाली जा पण जवळ असेल तरच. शाखा सुदैवाने जवळ होती. मी पहिल्यांदा रस्त्यावर सायकल त्यावेळेस चालवली होती. मला सुरुवातीला थोडी भीती वाटली पण नंतर सवय झाल्यामुळे मी एकटा जाऊ लागलो.
माझे असेच अनुभव वाचाण्याकरता फॉलो करा: -
वेद_इयत्ता_६वी ला
धन्यवाद.