🚩▬▬▬▬▬🚩🔹ஜ۩۞۩ஜ🔹▬▬▬🚩▬▬▬🚩
विचाररुपाने शिवजयंती साजरी करु या...
▬▬▬▬▬▬▬▬🚩 ஜ۩۞۩ஜ ▬▬🚩▬▬▬▬▬🚩 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
"तव शौर्याचा एक अंश दे।
तव धैर्याचा स्पर्श दे।
तव तेजातील किरण दे।
तव जीवनातील एक क्षण दे।
श्रीमंत छत्रपती शिवरायांचा आज जन्मदिन.शिवनेरी या उंच किल्यावर फाल्गुण वद्य तृतीया शके१५५१.१९फेब्रुवारी१६३०रोजी शिवनेरी या उंच किल्यावर जाहला.छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळपास चारशे वर्षे होत असले तरी, त्यांची कीर्ती,त्यांची महानता आणि त्यांच्या विषयीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत त्यांचे मोठेपण कायम अबाधित राहणार आहे.
ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवरून दिसतो त्यापेक्षा लाखो पटीने तो मोठा आहे,त्याचप्रमाणे युगप्रवर्तक शिवाजीराजे इतिहासकारांना,
संशोधकांना,अभ्यासकांना जेवढे माहिती आहेत. त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि महान आहेत.शिवराय हे नाव उच्चारताच अंगावर काटा उभा राहतो...हृदयाचे ठोके वाढतात...शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण होते.छाती अभिमानाने फूलते.अशा माझ्या राजांचा जन्मदिन.केवळ त्यांच्यामुळच मी माझ आजच नावही अभिमानाने उच्चारु शकतो.
शिवजयंतीम्हणजे,जयंती नसून जागृतीकडे जाण असत.दर्शनाकडून प्रदर्शनाकडे जाणे म्हणजे जयंती,चित्राकडून चरित्राकडे जाणे म्हणजे,जयंती.जल्लोषाकडून वाचनाकडे जाणे म्हणजे जयंती.
सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला, ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .
पुर्ण लेख वाचनासाठी ब्लाॅगला भेट द्या...
https://chanduchakrawar.blogspot.com/2021/02/blog-post_21.html
✍🏼--चंदु चक्रवार©