या विषयी कदाचितच कुणाला कल्पना असेल. अर्थात, याची कल्पना मला देखील न्हवती. परंतु आमच्या शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा या मधील कार्यरत प्रभारी प्राध्यापक डॉ. इंगोले सर यांनी एकदा आमच्याशी बोलतांनी हा विषय मांडला आणि चटकन माझ्या डोक्यात प्रकाश पडला. याबद्दल मी आणखी माहिती घेल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की, या संबंधित काही प्रमाणात बदल हा शहरी भागात होत आहे आणि काही निमशहरी भागात सुद्धा काही शिकलेल्या मुली लग्नानंतर देखील सर्व व्यवहार आपल्या माहेरच्याच आडनावाने करीत आहेत. मात्र ग्रामीण भागातील लोकांचा विचार केला तर याची कल्पना देखील त्यांना नाही. म्हणून मला असं वाटलं की आपण या विषयावर लिहावं.
लग्नानंतर मुलींनी आपल्या आई वडिलांचं आडनाव बदलून आपल्या पतीचा आडनाव लावावं याची घटनेत तरतूद केलेली नाही मात्र तरी देखील आपल्या समाजात लग्न झाल्यानंतर मुलींच्या आडनावात बदल करून पतीचा आडनाव लावला जातो. याचं सर्वात महत्वाचं आणि गलिच्छ कारण म्हणजे आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती आहे. याच अनुषंगाने मी काही मुलींना यावर प्रश्न विचारलो की, ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलं, लहानाचं मोठं केलं त्याच आई वडिलांचा आडनाव बदलवून तुम्ही एका नवीन व्यक्तीचा आडनाव का बरं लावता? त्यावर काही मुलींनी मला म्हटलं की सर, तुमचं अगदी खरं आहे आणि आम्हाला देखील मान्य आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिलं, लहानाचं मोठं केलं त्यांचा आम्हाला आदर आहेच मात्र सर, तो नवीन व्यक्ती आमचा होणारा पती असतो आणि आम्हाला आयुष्यभर त्यांच्यासोबत राहावं लागतं म्हणून आमचा कर्तव्य आहे की त्यांचा आडनाव आम्ही लावावं. मी तुमच्या या भावनांचा सन्मान करतो मात्र मला एक सांगा फक्त तुम्हीच त्यांच्यासोबत राहता काय? तुम्हालाच त्यांच्यासोबत आयुष्यभर राहावं लागतं काय? तुम्हीच सर्व कर्तव्य पाळायचे काय? त्यांचे तुमच्याप्रती काहीच कर्तव्य नाहीत? त्या पती ला सुद्धा तुमच्यासोबत आयुष्यभर राहावं लागतं ना...! मग तो स्वतःच्या आई वडिलांचा आडनाव ठेवू शकतो मग तुम्ही का नाही...? तुम्ही आणखी किती दिवस ती पूर्वापार चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती जोपासणार आहात? ज्या संस्कृती ने तुम्हाला समाजात कायम दुय्यम स्थान दिलंय. आता तुम्ही सर्व म्हणाल की, आम्ही जर लग्न झाल्यानंतर आपल्या नावात बदल केलं नाही तर समाज आम्हाला पत्नीचा अधिकार देणार नाही. तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय की, तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून करू शकता आणि समाज तुम्हाला पत्नीचा अधिकार नक्कीच देईल.
लग्नानंतर मुलीचं आडनाव बदलावे अशी घटनेमध्ये कुठेच तरतूद केलेली नाही त्यामुळे तुम्ही लग्नानंतर रितसर पद्धतीने विवाह नोंदणी करतांनी आपल्या माहेरचाच नाव टाकायचं आणि तो विवाह नोंदणी प्रमाणपत्र पुराव्यानिशी सादर करून नाही फक्त समाजात एक पत्नी म्हणून मान मिळवू शकता तर तुम्ही रेशन कार्डवर तसेच पती च्या संपत्ती मध्ये देखील अधिकार मिळवू शकता आणि पूर्वापार चालत आलेल्या या पुरुषप्रधान संस्कृतीला झुगारून लावून स्वतःची ओळख कायम ठेवू शकता ते देखील कायद्याच्या चौकटीत राहून. या समाजात अशा कितीतरी शिकलेल्या मुली आहेत ज्यांनी आजही आपल्या माहेरच्या नावात बदल न करता समाजात पत्नी म्हणून अधिकार मिळवून आपली ओळख कायम ठेवलेली आहे.
मला या विषयाची कल्पना दिल्याबद्दल आमचे प्राध्यापक डॉ. इंगोले सर यांचा मी आभारी आहे तसेच याबद्दल मला अधिकची माहिती देऊन मदत केल्याबद्दल वैष्णवी खलसे लातूर, अमित मंदा अनिल सातारा, प्रदीप स्मिता उत्तम पवार औरंगाबाद आणि चेतन नाईक ठाणे या सर्वांचा मी आभारी आहे.
आशु छाया प्रमोद (रावण)
7820994118