Bluepad | Bluepad
Bluepad
शिव जयंती
माधुरी पाटील
माधुरी पाटील
19th Feb, 2023

Share

विषय_ शिव जयंती
दिनांक_ १९/२/२०२३
लेखन_सौ. माधुरी शिवाजी पाटील जामनेर जिल्हा-जळगाव 🇮🇳🚩
सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मुजरा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
आज १९ फेब्रुवारी शिवजयंती. राजाधिराज! किर्तीवंत! नीतीवंत! यशवंत! धर्मरक्षी,व सिंहासनाधीश्वर!, प्रौढ! प्रौढ प्रताप पुरंदर! महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज! आपल्या राजांचा आज जन्मदिवस! आपल्यासाठी ही खूप गर्वाची बाब आहे. शिवरायांच्या जन्मभूमीत आपण अशा मराठी मातीत जन्म घेतला . अभिमान तर आपल्याला सर्वांनाच वाटायला हवा.
19 फेब्रुवारी म्हटली की आपल्या मराठी मातीचा रंग भगवा होतो. या मराठी मातीचतीत, भगव्या तरुण पिढीचं रक्त अंगात सळसळायला लागतं. भगव्या झेंड्याची रॅली काढत गल्ली गल्लीत मोठा जयघोष होतो. थोर असे महाराजांचे कर्तुत्व, इतक्या वर्षानंतर आजही मराठी मना मनावर शिवरायांचे कर्तृत्वाचे प्रभुत्व झळकताना दिसतं.
पण एक सांगू का मंडळी !आपल्या राजांचा इतिहास कसा व कितपत लोकांपर्यंत पोहोचला! आपण पुस्तकात तो कितपत वाचला ? किती समजुन घेतला! हे महत्त्वाचे आहे.
विजापूरचा आदिलशहा विरुद्ध लढा, मोगल साम्राज्यविरुद्ध लढाई,अहमदनगरची निजामशाही विरुद्ध लढा, महाराजांची आग्र्यावरून सुटका असे अनेक तह देऊन महाराजांनी आपले जीवन राष्ट्रप्रेमावर अर्पण केले. हा इतिहास तर सगळ्यांनाच ठाऊक आहे.
पण यापेक्षा वेगळे काय?
शिवजयंतीच्या दिवशी रस्त्यावर उतरणारी तरुण मुलांनी शिवचरित्र बखर वाचायला कधी हातात घेतली का? शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्य चा अर्थ त्यांना कळतो का?
आपल्या आईच्या जिजाऊ मातेच्या शब्दाला मान देत त्यांनी अगदी कमी वयातच अनेक गड किल्ले जिंकण्याचा त्यांचा ध्यास !नक्कीच या नवीन पिढीच्या युवकांना प्रेरणा देणारा आहे.
युवकांनी फक्त कपाळाला टिळा, डोक्याला पगडी आणि हातात तिरंगा मिरवला म्हणून आपल्या महाराजांना आनंद होणार वाटणार नाही, तर आपले राष्ट्र कसे टिकवून ठेवता येईल! आपल्या भगवा झेंड्याचा मान कसा उंचावेल! आपल्या मराठी मातीची शान! हे आपल्या तरुण मंडळींवरच अवलंबून आहे .ती कशी विकसित करता येईल ! यावर जर लक्ष दिले ना! तर आपल्या शिवाजी महाराजांनी कष्टाने उभारलेले राष्ट्र हे नक्कीच टिकून ठेवता येईल तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद होईल.!हे भान ठेवा शिवजयंती उत्सव हा फक्त एक दिवसाचा उत्सव नसावा ☝️तर या आपल्या छत्रपतींचा कर्तुत्वाचा कणा मनामनात रुजवावा. आणि प्रत्येक दिवशी शिवजयंती साजरी व्हावी . घराघरात एक मावळा जन्माला यावे व आपल्या महाराष्ट्राच्या मराठी साम्राज्याची शान मावळ्यांनी टिकवून ठेवावी .
महाराजांनी आपल्याला स्वराज्य स्थापनवुन दिले, पण महाराजांच्या कष्टाने उभारलेल्या स्वराज्यावर आपण स्वतःला किती झोकून दिले ? मराठी माती म्हणजे आपली आन-बान शान असणाऱ्या मातीत किती मावळे तयार झाले ?संस्कारांच्या शिदोरीत किती तरुण पिढी ने स्वतःला घडविले?
आपण स्वतःला मावळा म्हणून घेण्यात किती परफेक्ट आहोत? हा जरा सगळ्यांनीच अंतर्मनाने विचार करावा.
*छत्रपतींचे मराठा साम्राज्य म्हणजे _सुखी जनता
*छत्रपतींचे मराठा साम्राज्य म्हणजे_सुखी शेतकरी बंधू
*छत्रपतींचे मराठा साम्राज्य म्हणजे_ घराघरातील संस्काराची शिदोरी असणारी सुखी जिजाऊ माता.
*छत्रपतींचे मराठा साम्राज्य म्हणजे_ घराघरातील शिवबाच्या पावलांवर पाऊल ठेवणारे सुखी मराठा मावळे.
असा माझा महाराष्ट्र झाला ना! तर आपल्या छत्रपतींना नक्कीचं मराठा मावळ्यांचा अभिमान वाटेल. 🙏🏻🚩
जय हिंद 🇮🇳🚩🚩
जय महाराष्ट्र 🇮🇳🚩🚩
जय शिवराय 🇮🇳🚩🚩
हर हर महादेव 🇮🇳🚩🚩
शिव जयंती
स्वलेखनातुन काही शब्द _लेखिका _माधुरी शिवाजी पाटील जामनेर जिल्हा-जळगाव महाराष्ट्र 🇮🇳🚩

0 

Share


माधुरी पाटील
Written by
माधुरी पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad