*शक्ति कोणाच्या हाती केंद्रीत आहे त्या नुसार धर्म अधर्म ठरतो*
सत्य, असत्य हे युगोयुगे चालत आलेले आहेत . त्यांचा जसा वापर होईल तसं युग ठरत .आपली शक्ती सत्ता, अधिकार, ताकद वापरताना आपण कोणाची बाजू घेतो त्यानुसार धर्म अधर्म ठरत असतो .आपली अधिकार वापराची मानसिकता बदलली पाहिजे प्रत्येकाने ठरवलं माझा अधिकार माझी ताकद सत्य मार्गाने वापरणार तर धर्माच अस्तित्व आपोआप वृद्धिंगत होईल.आपण मुल्यमापन करताना स्वतःला वजा करून इतरांच मुल्यमापन करतो . म्हणून परीणाम स्वरूप मुल्यमापन चुकतं हे जरी सत्य असल तरी हे कटु सत्य कोणीही मान्य करणार नाही. युग ,काळ कोणताही असो आपण कोणाच्या बाजुने झुकलो अथवा आपलं बळ हे कोणाच्या बाजूने वापरलं त्यानुसार धर्म अधर्म ठरत असतो . शक्ति ,ताकद, बळ ,सत्ता ,सामर्थ्य हे जर सत्याच्या हातात केंद्रित असेल तर ते आपोआप च सत्य कार्य साठी वापरलं जात शस्त्रा नुसार संस्कृतीन्वये तो धर्म ठरतो .आणि शक्ति, ताकद, बळ ,सत्ता, सामर्थ्य हे जर असत्याच्या हातात केंद्रित असेल तर ते आपोआप सत्याच्या कार्यासाठी वापरलं जातं व तो अधर्म ठरतो . शक्ति सामर्थ्य ताकद बळ हे तेच आहे .पण ते कोणाच्या हातात केंद्रित झालं आणि कोणत्या मार्गाने दिशेने वापरलं यावरूनच शेवटी धर्म अधर्म ठरतो.कोणत्याही क्षेत्रातील शक्ति सामर्थ्य बळ सत्ता ताकद अर्जित केल्यानंतर त्याचा वापरकर्ता हा ज्या पथ मार्गावर आहे अथवा जशी भुमिका घेतो त्या पथ मार्गाचा तो कार्यकाळ ठरतो . म्हणजे युग कोणत आहे काळ वेळ कसा आहे हे फार महत्त्वाचे नाही. या पेक्षा हि बळाचा, सत्तेचा वापरकर्ता हा सत्यनिष्ठ असेल तर त्याचं कार्य धर्म शास्त्रानुसार धर्म मार्गावर लोकहितकारक आपोआप ठरत. त्या साठी विशेष काही उपाययोजना करण्याची अथवा वेगळे काही प्रयत्न करण्याची आवश्यकता भासत नाही.पण हाच वापरकर्ता हा जेव्हा असत्याच्या मार्गाने दिशेने मार्गक्रमण प्रवास करतो. तेव्हा मात्र आपोआप अधर्माच साम्राज्य अस्तित्वात येत . आणि त्या पद्धतीने तसं आपोआप घडत. विषय रामायणातील असो महाभारतातील असेल वा व्यक्तिरेखा कोण आणि कशी आहे यापेक्षा पथ मार्ग कसा निवडला भुमिका कशी घेतली या ऐवजी शक्ति सत्ता बळ त्या कालखंडात कोणाकडे आहे. त्यानुसारच त्या त्या काळातील धर्म अधर्मा ची परिभाषा निश्चित होते . निसर्ग हा आजपर्यंत पाहिलं तर सत्याच्या धर्माच्या बाजूने बहुतांश वेळा उभा रहिलेला आपल्याला दिसेल. सत्य,असत्य , धर्म, अधर्म हा फार दुर शोधायला जाण्याची आवश्यकता नाही. एखादया कामाच्या अनुषंगाने अथवा एखाद्या विषयाच्या अनुषंगाने ते कार्य करण्याची ताकद धमक क्षमता आपल्या मध्ये आहे . आणि त्याच वेळी आपण ते कार्य करताना झुकतं माप जर सत्याच्या बाजूला दिलं तर आपण धार्मिक ठरतो .आणि त्याच वेळी आपण झुकत माप हे असत्याला दिलं तर तो आपसुकच अधार्मिक ठरतो . म्हणजे धर्म अधर्म हा बाहेर शोधणयाची फार आवश्यकता नाही.आपण आपलं झुकत माप कोणाला दिलं त्या नुसारच आपण कोण हे निश्चित होत . मुळात धर्म अधर्म निर्मिते पालनकर्ता वृद्धिंगत करते आपणच आहेत .मग आपण इतर जगाला दोष देण्यात अर्थ काय धर्म पालनाची जबाबदारी जर स्वतःपासून सुरुवात केली तर अधर्माच अस्तित्व हे शोधून सुद्धा कुठं सापडणार नाही.पण सुरवता हि स्वतःपासून झाली पाहिजे. आपण आपली नितिमता हि सत्याच्या मार्गावर ठेवली . प्रत्येक बाबीवर आपलं मत आपली भूमिका सत्याच्या बाजूने वापरली ठेवली तर धर्म ची जपाणुक हि आपल्या स्वतःपासून होईल आणि त्याचे सुयोग्य परिणाम हे आपल्या कुटुंबातील इतर सदस्य पण आपलं अनुकरण करतील प्रत्येक चांगल्या वाईट बाबीच मुळ हे आपल्या सोबत जोडलेल असत आपण जसं आचरण करू तसंच त्याचं स्वरूप विस्तार होतो . म्हणून आपण सत्याची कास धरली तर धर्माच साम्राज्य निर्माण आपोआप होईल. व्यक्तिगत जीवनात असो वा सार्वजनिक पटलावर आपल्या विचारांची दिशा आचरण आपली भुमिका मत शक्ति सत्ता ताकद बळ हे वापरताना सत्याचा स्वीकार आणि वापर झालाच पाहिजे म्हणजे आपोआपच धर्मच राज्य प्रस्थापित होईल.आणि धर्मच राज्य हे स्वतः पासून चालु झालतर आपोआप इतर सुद्धा त्याच अनुकरण करतील पण सुरवात हि प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301