Bluepad | Bluepad
Bluepad
मानाचा मुजरा
मनिषा भालके
मनिषा भालके
19th Feb, 2023

Share

सह्याद्रीची कडेकपारी आनंदून गेली सारी।
जन्मली जेव्हा स्वराज्यसूर्य छत्रपतींची स्वारी ॥
स्वराज्य शपथ घेतली बालपणी रायरेश्वरी।
स्वकियांना न्याय देणारे रूप मोहक ईश्वरी ।|1||
पराक्रमाने जिंकली मावळी मने अन् गड अनेक!
चितपट करून शत्रूना चढले न्याय्य पायरी एकेक ||
बलाढ्य गनिमाला ठेचून काढी गनिमी कावा।
आजन्म लढला शहाजी जिजाऊंचा छावा ॥2||
कल्याणच्या सुभेदारांची सून नखशिखांत लावण्यवती।
"अशीच आमची आई असती" वदले छत्रपती॥
पर स्त्री आई समान मानणारा देव माझा।
लोकहितकारी तेजस्वी पराक्रमी जाणता राजा ||३||
प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढला किर्तीमान शिवसूर्य|
नयन दिपवून जगाचे अजरामर झाले शौर्य।।
शेकडो वर्षानंतरही जिवंत शिवकार्याची ख्याती|
शिवविचाराची पायधूळ अजूनही घेते मराठी माती ||4||
जातीच्या नाही अन्यायाविरोधात राजे लढले ।
न्यायाची मशाल पेटवून धन्य ते छत्रपती जाहलें ॥
अष्टपैलू शूरवीर कुशलतेला मानाचा मुजरा।
अशा या प्रतिभासंपन्न ईश्वराला मानाचा मुजरा ॥5॥
✍🏽मनिषा भालके

0 

Share


मनिषा भालके
Written by
मनिषा भालके

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad