Bluepadदाटूनी कंठ येतो
Bluepad

दाटूनी कंठ येतो

N
Nutan pattil
19th Jun, 2020

Share

दाटुनी कंठ येतो.....

नूतन सावंत पाटील😊
सप्तपदी झाली, मंगलाष्टका पडल्या, विवाह सोहळा सुंदर रित्या पार पडला आणि तिची निरोपाची वेळ जवळ आली... नव्या जीवनाच्या नाविन्याला ती पण आनंदित झाली होती.. आता ती चालली होती पण मागे मागे वळून पाहत होती....
माझ्या चेहर्‍यावर पण आनंद होता,,, पण माझा कंठ दाटून आला होता... धाय मोकून रडावेसे वाटत होते... क्षणभर असे वाटत होते कि मी आता कोसळेन... कुणीतरी माझा श्वासच नेत आहे ...माझे प्राण चाललेत....
माझ्या डोळ्यासमोर चित्रपट दिसू लागला.. तिच्या जन्मापासून ते लग्नापर्यंत चा प्रवास... लक्ष्मीच्या सोनपावलांनी आलेली माझी ""लाडकी"".. ती जन्माला आली आणि खरच माझी प्रगती झाली..."" लक्ष्मीच माझी""साक्षात लक्ष्मीने जन्म घेतला माझ्या पोटी...
तिचे बोबडे बोल,, लुटू-लुटू चालणे,,, सुखावून गेलो मी.... इवलीशी परी,,,, तिला पाहून तृप्त झालो मी....
किती किती गोड बोलणे... सारखे बाबा _बाबा_ बाबा....
शाळेत जाऊ लागली,, तिच्या छोट्या छोट्या मागण्या... बाबा मला पेन हवाय... बाबा मला बुक हवी...‌ सगळे लाड पुरवत गेलो मी....
गॅदरिंग ला भाग घ्यायची तर मला खूप आनंद व्हायचा... तिच्या आई पेक्षा माझी तयारी जोरात.... तिला काय हवे काय नको मला काळजी..... माझी परी ""सुंदर ""दिसली पाहिजे..
तिचा ट्रिपचा हट्ट पुरवणारा बाबा मी.... ती लांब निघाली म्हणून काळजीत पडणारा मी..
बाबा माझे पाय दुखतात,,, बाबा मी पडले,,, बाबा मला बरं नाही वाटत..‌ सारखे बाबा बाबा_
माझी सकाळ झाली की मी तिचा हसरा चेहरा पहायचो... किती गोड 'माझी मुलगी' तिच्यामुळेच माझ्या घरी आलेले चैतन्य.... सगळे सणवार मध्ये आनंद घेणारी.... सुबक रांगोळी काढणारी,, मेहंदी काढणारी,,, तिच्या पैंजणाचा आवाज संपूर्ण घरात येणार....
सुंदर दिसणारी सुंदर नटणारी गोड गोड...
देवपूजा करणारी तीच,,, गुढीपाडव्याचा आनंद तिलाच...‌ रक्षाबंधन आनंदाने साजरे करणारे... पंचमीचा सन तिचाच..‌ गणपती गौरी चा उत्साह तिला किती.....
दिवाळीत नवीन कपडे घालणारी,,,, फटाके उडवणारी आणि मिठाई साठी हट्ट करणारी..
""" माझी परी""""
मोठी झाली तर तिने माझी काळजी घेतली जणूकाही आईच बनली माझी... बाबा तुम्हाला चहा... बाबा तुम्ही जेवलात?? बाबा इतके काम करू नका... बाबा तुम्ही औषधे घेतलीत???
कपडे तर मी तिच्यात पसंतीची बाबा तुम्ही हा ड्रेस घाला तुम्हाला छान दिसतो...
आणि पथ्य-पाणी संभाळणारी....
थकून घरी आलो की तिचा उत्साह बघूनच आनंदून जाणारा मी.....
कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे .. माहीत आहे मला... शिकलेल्या सुंदर, संस्कारी, सुशील, मुलीसाठी तिच्या तोडीचे घर मी पाहिले... तिच्या सुखी आयुष्यासाठी मी तिला चांगला वर शोधला... त्या घरात ती खरच खूप सुखी राहणार... जगाची रीत,,, मुलगी हे परक्याचे धन.... ती आपल्या घरी निघाली.....
पण थोड्या कालावधीसाठी पण तिचा विरह सहन करणारा मी... शाळेतून घरी लवकर नाही आली तर कासाविस होणारा मी.. छोट्या पदीं स्कूटरवर तिला फिरवणारा मी... किती गर्व मला तिचा दिसण्याचा,,, तिच्या हुशारीचा,,,
नटखट माझे पिल्लू आता मला सोडून निघाले....
सकाळी मी आता कोणाचा चेहरा पाहू?? कोण मला बाबा बाबा करणार??
कोण माझ्या अंगणात खेळणार?? हाच विचार माझ्या मनात..‌ माझी काळजी कोण घेणार... हट्ट कोण करणार?? जसे काही तिच्या जाण्याने माझे जीवन संपत आहे.....
सोपे नाही ""कन्यादान"""
त्याची मुलगी म्हणजे स्वतःचा जीव दुसऱ्याच्या स्वाधीन करणे...
रडायला तर खुप येत होतं पण मी तिच्या सुखी जीवनाची आकांक्षा करत होतो ...मी माझे अश्रू लपवत होतो... पण माझा कंठ खूप दाटून आला होता....

दाटूनी कंठ येतो, ओठात येई गाणे...
आपल्या घरी तू, जा लाडके सुखाने....


13 

Share


N
Written by
Nutan pattil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad