मी हजार वेळा थांबवेन त्याला...
पण त्याची इच्छा आहे का थांबण्याची...?
मी हजार वेळा बोलावेन त्याला
पण त्याची इच्छा आहे का परत येण्याची...?
मी हजारवेळा बोलेन त्याच्याशी
पण त्याची इच्छा आहे का ऐकण्याची...?
मी हजारवेळा ऐकून घेईन त्याचं
पण त्याची इच्छा आहे का बोलण्याची...?
मी सदैव तयार आहे त्याची बनून रहायला
पण त्याची इच्छा आहे का मला आपलं म्हणण्याची...?