*छोटा मोह टाळता आल्या शिवाय मोठ्या मोहाकडे पाठ फिरवता येत नाही*
मोह म्हणजे हव्यास आणि हव्यास म्हणजे फक्त हवंच नको काहीच नाही .किती हवं याचा थांगपत्ता नाही.कशासाठी हवं याचा सुद्धा कधी कधी भान राहतं नाही .पण हव्यास एकदा का मेंदुत शिरला कि तो त्याच कार्य करूनच थांबतो . म्हणून हव्यास हा चांगला पण ठरू शकतो. आणि घातक पण ठरू शकतो मोह हा नेमका कशाचा आहे .त्यावर त्याचे चांगले वाईट परिणाम अंवलबुन असतात.मोह , सत्याचा, न्यायाचा,ईमनादारीचा, निस्वार्थतेचा , प्रमाणिक धर्म निष्ठ आचरणाचा, सात्विक वृत्ती जोपसण्याचा , सत्याचा साक्षात्कार होण्याचा, आध्यत्मिक मार्गावर मार्गक्रमण करण्याचा, असेल तर हे सर्व मोह जीवनाला सार्थकतेकडे घेऊन जातात.आणि याविरुद्ध जर मोह ,नाव पद, पैसा, संपत्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा ,मोठेपणा, इत्यादी बाबींचा असेल तर तो योग्य वेळी आवरता आलाच पाहिजे. नाही तर त्याच रूपांतर हे व्यसनाधिनते मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.जर मोहाच व्यसनात रूपांतर होऊ देयच नसेल तर सुरवातीला छोटा मोह हा टाळताच आला पाहिजे.एकदा का जीव मोहाच्या नौकेवर स्वार होऊन सुसाट झाला कि मग तो आपल्याला समुद्रात बुडलवल्याशिवाय राहत नाही. आणि बुडे पर्यंत आपल्याला पण फार काही कळतं नाही . बुडाल्या नंतर लक्षात येऊन सुद्धा नंतर काही अर्थ नाही म्हणून मोह कोणाताही असो सावध पवित्रा घेण हेच हितकारक असत. कोणत्याही विषयाची सुरुवात निर्मिती हि कधीही शुन्यातून म्हणजे अगदी छोट्या बाबी पासून होते . सुरवात हि कधी पण लहानच असते .मग ती चांगल्या विषयाची असो कि वाईट पण सुरवातीला लहान दिसणारी बाब नंतर अक्राळ विक्रळ रुप धारण करते .हिच बाब आपल्याला पहिल्या टप्प्यात म्हणजे अगदी सुरुवातीला समजली तर आपण सुरवातीला रोखु शकतो . आणि खूप मोठ्या नुकसानी पासुन आपण वाचतो .म्हणून छोटा मोह रोखता आला तर अगदी मोठ्या मोहाकडे पाठ फिरवता येते .कोणत्याही विषयाची सुरवात आरंभ हा जरी कधीही लहान लहान गोष्टी पासून होत असला तरी .जो व्यक्ती लहान सहान गोष्टी मध्ये अडकत नाही फसत नाही. तो उद्या मोठ्या विषया मध्ये सुद्धा फसत नाही .जीवन आणि मोह हे नातं जरा विचित्रच असतं . जीवाला कधी कशाचा मोह होईल आणि त्या मोहापायी कधी आपलीच शिकार होईल हे आपल्याला थांगपत्ता सुद्धा लगणार नाही.मोह हा एक प्रकारचा नसतो .सृष्टी वर अनेक बाबी आहेत ज्यामध्ये,नाव पद पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, मोठेपणा, वगैरे वगैरे मोहाच्या प्रत्येक प्रकारचा स्वरूप वेगळं असतं .क्षेत्र कोणतही असेल त्या क्षेत्रात आपणं दैनंदिन वावरत असताना आपल्याला अनेक अनुभव प्रत्याक्षात अनुभुतीस येतात कि आपल्या कडे जर लाभाच पद असेल तर अनेक लोक आपल्याला सुरवातीला छोटी छोटी प्रलोभने देण्याचा प्रयत्न करून जवळीक साधतात आणि आपण सुद्धा छोट्या छोट्या प्रलोभनाला बळी पडतो म्हणजे अगदी सुरुवातीला एक चहाचा कप हे सुद्धा प्रलोभनच तो एकदा घेतला कि ज्याने पाजला तो दुसरं किती ही मोठं प्रलोभन देण्यासाठी मोकळा झाला.आणि आपणही एकदा चहाचा कप स्वीकारला असल्याने मोठ प्रलोभन म्हणजे मोठा मोह टाळु शकत नाहीत.हि वस्तुस्थिती आहे. मग हाच मोह व्यसन म्हणुन उदयास येतो.आणि आपल्या जीवनाच वाटोळं करून सोडतो.पण हि गोष्ट आपल्याला सुरवातीला कळत नाही. आपण कसं मोहाच्या सापळ्यात अलगद अडकतो हे आपल्याला हि कळत नाही. व्यावसायिक मोहाची बाब सोडली तरीही दैनंदिन आयुष्याशी निगडीत मोहाच्या बाबी मध्ये पद ,पैसा, संपत्ती, मोठेपणा, प्रसिद्धी,हे मोह तर एवढे भयानक आहेत या मधुन आपण स्वतःला वेळीच सावरू शकलो नाहीत तर मग एक दिवस आपण खुप मोठ्या नुकसानीला सामोरे जाऊ . त्या मुळे आपण स्वतःला सावरुन छोट्या मोहा मध्येच आटोक्यात घेतल तर आपण मोठ्या मोहाकडे पाठ फिरवू शकतो . म्हणून वेळीच जागृत होणं गरजेचं आहे. स्वतःला मोहापासून दूर ठेवण्यासाठी आध्यत्मिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे.आपल्याकडे योग्य असं आध्यत्मिक ज्ञान असेल तर मोह कोणाताही असेल तो आपल्यावर फार प्रभाव निर्माण करू शकणार नाही.तसेच आपण सुद्धा काय योग्य काय अयोग्य आणि किती हव्यास केला पाहिजे याची एक मर्यादा रेषा असते ती ओलांडून पुढे जाऊ शकत नाहीत.महणजे मोठ्या आणि जीवघेण्या मोहाकडे पाठ फिरविण्यासाठी आपण तेव्हाच सक्षम होऊ जेव्हा आपण छोट्या छोट्या मोहाकडे दुर्लक्ष करण्या इतपत सक्षम असु .
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301