Bluepad
बाप
sudhakar manwatkar
25th Jan, 2023
Share
बाप कधीच म्हातारा
होत नसतो..
मुलांच्या सुखासाठी तो
सतत धावत असतो...
बाप कधीच म्हातारा
होत नसतो.....।।
हसत खेळत काट्यातली
वाट तो तुडवत असतो.
उन्हांच्या पावसाच्या मारा
तो खांद्यावर घेत असतो..
बाप कधीच म्हातारा
होत नसतो.....
स्वातःहाच्या सुखाचा तो
कधीच विचार करत नाही.
दुःख मनात तो ठेवून..
जगासमोर हसत असतो..
बाप कधीच म्हातारा
होत नसतो....
अनवाणी राहुन ही त्याच्या
पायात कधी काटा रुतत नाही.
भरलेल्या घरात आई शिवाय
जगण्यासाठी फक्त बाप असावा लागतो.
बाप कधीच म्हातारा
होत नसतो...
स्वप्नंच्या बाजारात विकणारा
तो बाप म्हणजे बाप असतो.
नसेल ज्याच्या सोबतीला तेव्हा
मित्रहो..बाप गेल्यावर खरा बाप कळतो.
बाप कधीच म्हातारा
होत नसतो...
-
सुधाकर शिवाजी मानवतकर
बुलडाणा.
7276175143
1
Share
Written by
sudhakar manwatkar
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us