स्पंदनानी हरवले मन
स्वप्न गजबजले ....
चंद्र साक्षी मनी मोह अवतरला
स्पर्श स्पंदी ध्यास डगमगला....
चांदणी ने केला इशारा
शिवार दरवळला....
फुले स्पंदनाची खुलुनी
मला भाव सांगू लागली
शांत पावसाच्या धारा
मनी भिरभिरतो गार वारा
थंड लाटेचीया मजला
कशी चाहूल ही लागली...
प्रीतिचीया या रात्री
मंद वाराशी प्रीत जुळली
समावता मज् त्यात
माझी प्रित ही कळली....
खुल्या अवकाशाची मी
वेगळी च मजा लुटली
त्या स्पंदनानी मला
खुलून साध घातली.......
_संजना पाटोळे