स्वातंत्र्यदिनी, स्वातंत्र्यवीरांप्रति माझ मन भरुन येतं.
पण प्रजासत्ताक दिनी माझ्या मनात काहूर माजतं.आपण लोकशाही स्विकारली आहे.पण संसद अजूनही माझी वाटत नाही.सरकारही माझे वाटत नाही.प्रसाशनाशी काही काम निघालं की उदास,नकार मन:स्थितीतच जावं लागतं.न्यायालयाबाबत" शहाण्याचे कोर्टाची पायरी चढू नये हे सनातन शहाणपण अंगी बाणवावं वाटतं.आणि उरले पत्रकार.कोर्टात मिळतं त्याला न्याय म्हणतात,तस आज बातमी म्हणून जे दाखवलं जातं,छापलं जातं त्याला बातमी म्हणावी लागते.चेकॉव्ह म्हणाले होते,संकटप्रसंगी एखादा मुर्ख ते सहज निभाऊ शकतो,पण दैनंदिन जगणं फार कठीण आहे.मतदार म्हणुन क्षणिक किंमत वाट्याला आली ती स्विकारून म्हणायचे का,प्रजासत्ताक चिरायू होवो! असा प्रश्न मनाला सतावत आहे..तरीही मी मनापासुन
म्हणणार आहे," मेरा भारत महान ".कारण हे व्यक्त करणं,आणि याच्याशी सहमत होणारे समविचारी मला याच प्रिय देशात मिळतात.