आता झालो मी चित्रकला परीक्षा पास….
लहानपण आमचं खेड्यात गेलं शाळेंत कोणतीही परीक्षा आली की सहभाग घेत होतो मग ते हिंदी ची परीक्षा असो की कोणतीही असो भाग घेणे आपले काम पास होणे नापास होणे याच्याशी काही देण घेणं नाही शिक्षवृत्ती ची परीक्षेत चव थित पास सातवीत नापास, टायपिंग लावली त्यात अजूनही पास नाही झालो, तशीच एक परीक्षा होती की त्यात मी आज पास झालो ती म्हणजे चित्रकला (एलीमेन्ट्री) ची परीक्षा आता तुमाले प्रश्न पडला असिन की हा आता कसा काय पास झाला तं झालं असं हें परीक्षा म्या त्या वेळेस ३ खेप दिली अकोट ले जाऊ जाऊ, बकेट, ठेवली राहे एक प्लेट त्यात सफरचंद, केळ असत मले काही ते जमे नाही, नाहीतर फुगेवाल्या माणसाचे चित्र काढण्यास सांगत असत परंतु आपला बजेट काही बसत नव्हता आपण फक्त निसर्ग चित्र काढण्यात पटाईत होतो तीन वेळा नापास होण्याचा यशस्वी प्रयोग मी केला आणि मनाला विचार केला की आता आपल्याला थांबायला पाहिजे आणि थांबलो सुद्धा चित्रकला परीक्षा आपण नापास आहोत हें मात्र मनात नेहमीसाठी चिटकलेल राहील होत.
पालकांनी जे नाही केले ते त्याच्या मुलांनी करावे अशी अपेक्षा पालकांना नेहमीच असते आणि त्यासाठीच त्याची धडपड सुरु असते आणि मुला कडून तसे काही घडले तर होणारा आनंद तर काही वेगळाचं असतो, तसेच आज माझे सोबत काही घडले माझी मोठी मुलगी ही चित्रकला पहिली परीक्षा A मध्ये पास झाली आणि ती गोस्ट तिने मला सांगितली मनाला खूप खूप आनंद झाला जे मला करता आले नाही ते माझे मुलीने कोणताही क्लास न लावता अगदी सहज करून दाखवले आता मी ती परीक्षा पास झालो असे मला वाटले. खूप खूप शुभेच्छा सिद्धी असेच सर्व परीक्षा पास होवो हीच शुभेच्छा…