Bluepad | Bluepad
Bluepad
विश्वास आणि कृतज्ञता हेच जिवनातील श्रेष्ठत्व .
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
25th Jan, 2023

Share

जिवनात नेहमीच चांगले नाते , चांगले संबंध , चांगले कर्म , चांगले मित्र कायम स्वरुपी टिकतात असं कांहीच नाही . अनेकदा गैरसमज , स्वार्थ , स्वहीत , जोपासत असताना संबंधांना तडा जातो , आणि नाते संपुष्टात येतात . आणि एकदा की विश्वास संपला की पुन्हा ते जुळणे तेवढेच कठीण . हे संबंध नाते फार नाजुक असतात . जणुकाही गुलाबाच फुल . ऊगवल की टवटवीत सुंदर दिसणार गुलाबाच फुल केव्हा पाकळ्या गळुन पडतील काही सांगता येत नाही . एकदा विश्वास संपला कि ते अविश्वास च्या विटे प्रमाणे बनतात . जे आपल्या नात्यातील मजबूत इमारत कमजोर होत नष्ट करण्या समान असते . करीता विश्वासाची विट इतकी मजबुत हवी की नाते तेवढेच मजबूत असणार . ज्या प्रकारे लिहिताना चुका झाल्यास पुर्ण वहीच फाडली जात नाही . तो पानच फाडून फेकला जातो . त्याच प्रकारे जर नात्यात चुक असलेला प्रसंग काढुन टाकला तर नातं पुर्ववत कायम असु शकतात . अशाप्रकारे बुध्दिमान माणस विश्वास तोडण्या ऐवजी प्रेमपुर्ण नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. विश्वासच नातेसंबंधाना मजबूत करीत असतो . जेव्हा प्रत्येक बाबींचा मुल्यमापन स्वताच्या दृष्टीकोनातून केले जाते तेव्हा नात्यात अविश्वासाची विट तयार होत असते . आणि हे टाळण्यासाठी भावना तेवढिच महत्त्वाची . जी गोड नात्यांना जोडली जातात . आणि ते नातेसंबंध टिकवली जातात . चांगली माणसं जिवनात येत हा नशीबाचा भाग असु शकतो . परंतु ते टिकवण सांभाळणं जोपासण ठेवणं तेवढेच हेच माणसाचं जिवन विश्वास आहे . विश्वास आणि परमेश्वर दोन्ही अदृश्य आहेत . मिळतात त्यांनाच जे श्रध्दा ठेवतात . नकळत निघालेले शब्द विषाच काम करते . ते जिवनात संपवित नाही तर उध्वस्त करीत असते . उच्च आशा ,आकांक्षा उद्दिष्टे पुर्तिसाठी भरपुर प्रयत्नांची आवश्यकता असते . आणि अथक परिश्रम करणारेच भविष्य रचतात . लोक त्यांनाच पागल म्हणतात . आणि पागल लोकच इतिहास रचतात. , लिहीतात आणि शिकणारे तर इतिहास वाचतात. हाच विश्वास आणि अविश्वासाचा फरक आहे . जिवनात बरच काही असंच विश्वास अविश्वास कमी अधिक प्रमाणात चालुच असते . ज्याप्रमाणे विहीरीतलं पाणी तृप्त करण्याची पुर्ण क्षमता असते परंतु झुकल्या शिवाय ओंजळीत घेता येत नाही . जिवनात सुध्दा देण्यासाठी बरंच काही आहे . परंतु विना कृतज्ञता नम्रता याशिवाय अशक्य आहे . नम्रतेने चालणारा मनुष्य जिवनाच्या योग्य मार्गावर प्रगतीचे संकेत आहे . तर अहंकाराच्या मार्गावर सारंच नष्ट होण्याचे लक्षणं. जास्त असतात . जसं कृतेज्ञतेने विभिषणाला राज्य मिळाले तर रावन चे दहा सिर कापले गेले ..

0 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad