विनाकारण का लावलेला जीव
अड़चणीच्या वेळी मुद्दामहून रुजू घातलेला दुरावा
आजही आठवतो मला तो चिंब भिजला
नसतांनाही महापुर आसवांचाही व्हावा
अचानकच का दिली असावी हाक
मन भाकीत करत असेल,निहित स्वार्थ म्हणुन वाक
हळू-हळू मित्रत्वर्थाने जवळ आला
नि माणुसपण हरवुन शेवटी माणुसच झाला
अति गोड़ माणसा असतो विषारी साप
या चुकीचा वारंवार नको करुस पश्चात्ताप
ज्ञानाची उंच भरारी
ज्ञानाने वाटले परिपुर्णता आली सर्वकाही
पण एक अज्ञान म्हणुन
माणसं ओळखता आलीच नाही?