Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ .....
विश्वास बीडकर
25th Jan, 2023

Share

शुभ बुधवार .
अशी तिन घरं असतील का ?
आरसा , देवघर आणि टी .व्ही . नसलेली घरं .
फक्त पुरूष मंडळी चं राहत असलेलं आरसा नसलेलं घर कदाचित असु शकेल .
पण ,
दोन वर्षांची चिमुरडी ते ऐंशी वर्षांच्या आजी असणारया घरात आरसा असेलच . घरा बाहेर पडतांना आरशात डोकावण्याची सवय एवढी अंगवळणी पडली आहे की चुकुन ही ही चुक होतं नाही .
देवघर नसलेलं घर तसं दुर्मिळ असावं . एखादा देवाचा फोटो , छोटीशी मुर्ती तरी घरात असतेचं .
अंनिस कार्यकर्ते याला अपवाद असतील . छान फुलांनी सजलेलं देवघर पाहणं हा समाधानाचा क्षण असतो . आस्तिक - नास्तिक या पेक्षा सौंदर्य दृष्टी महत्वाची ठरते . प्रश्न पडतो , देवघर नसलेलं घर आणि
घर मालक - मालकीण यांच श्रध्दास्थान काय असेल ? खंबीर मनाचे असतील का हे लोक ?
का , हट्टी असतील , टोकाच्या विचारांचे असतील ?
शेवटी , टी .व्ही . किंवा तत्सम करमणूकीचे साधन नसलेलं घरं . मराठी सिरियल दिसणार नसेल तर चालेल पण गाणी , स्पोर्ट्स आणि बातम्या न बघता ही जगता येतं असेल का ?
अशा घरांत पुस्तकांचं भरलेलं कपाट असेल तर अभिमान वाटेल . पण पुस्तकं वाचून झाल्यावर ह्या व्यक्ती काय करत असतील ? चालतं - बोलतं दृष्य पाहणं हा आनंद चं असतो . याला काय पर्याय असेल यांच्या घरात ?
हे लिखाण वाचल्यावर तुमच्या मनाला ही प्रश्न पडले तर माझं यश .
नाहीतर असं ही होऊ शकेल ,
" गप्प बसून रहा की . तुला काय करायचंय . कशाला दुसरयांच्या घरात डोकावतोस ? "
विश्वास बीडकर .
२५ जानेवारी २०२३ .

0 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad